'नशीबवान'चा पहिलाच एपिसोड अन् फुल ऑन ड्रामा! खतरनाक व्हिलन अन् हिरोची फिल्मी स्टाइल एन्ट्री

Last Updated:

Nashibvan Serial : आदिनाथ कोठारेच्या नशीबवान मालिकेचा पहिला एपिसोड 15 सप्टेंबरला टेलिकास्ट झाला. मालिकेचा पहिलाच एपिसोड फुल ऑन ड्रामाने भरलेला होता.

News18
News18
मुंबई : दमदार स्टारकास्ट असलेली 'नशीबवान' ही मालिका 15 सप्टेंबरपासून स्टार प्रवाहवर सुरू झाली आहे. या मालिकेची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. अभिनेता आदिनाथ कोठारे, नेहा नाईक, अजय पूरकर, सोनाली खरे हे कलाकार यात प्रमुख भूमिका आहे. आदिनाथ कोठारे म्हणजेच रुद्र आणि नेहा नाईक म्हणजेच गिरीजा यांच्यावर ही मालिका आधारित आहे. मालिकेचा पहिलाच एपिसोड फुल ऑन ड्रामाने भरलेला होता.

नागराज घोरपडेची एन्ट्री आणि खून 

अभिनेते अजय पूरकर यांनी 'नागराज घोरपडे' ही भूमिका साकारली आहे. एपिसोडची सुरुवातच 25 वर्षांआधी घडलेल्या एका घटनेनी झाली. ज्यात नागराज हा गिरीजाच्या आई-वडिलांचा खून करत असल्याचं दाखवण्यात आलं. लहानपणीच आई-वडिलांचा खून गिरीजाने तिच्या डोळ्यांनी पाहिलेला असतो. नागराजच्या हातात असलेल्या कड्यातील घुंगरांचा आवाज तिच्या मनात खोलवर बसला आहे.
advertisement

आदिनाथ कोठारेची ( रुद्र) फिल्मी स्टाइल एन्ट्री 

एपिसोडमध्ये पुढे मोठी गिरीज दाखवण्यात आली आहे. जिची आई या जगात नाही. लहान भाऊ आहे आणि वडील दारूच्या अड्ड्यावर असतात. वडील आणि भावाला सांभाळण्यासाठी दहावीत शिक्षण सोडून साड्यांच्या दुकानात ती काम करते. गावात तिला त्रास देण्यासाठी एक मुलगा तिच्या मागे असतो. ज्याला ती चांगलाच इंगा दाखवते. घरी वडील तिला 'तू माझी मुलगीच नाही' असं म्हणतात. दारूच्या नशेत बरळणाऱ्या वडिलांकडे ती दुर्लक्ष करते. दारूचे पैसे देण्यासाठी शाळेत गिफ्ट मिळालेलं घड्याळ विकते. तिचा लहान भाऊ तिच्यासाठी नवीन घड्याळ आणण्यासाठी जातो तेव्हा त्या दुकानाला आग लागते आणि तो आगीत अडकतो. तिथेच मालिकेच्या हिरोची म्हणजे आदिनाथ कोठारेची एन्ट्री होते. आगीत अडकलेल्या गिरीजाच्या भावाला फिल्मी स्टाइलनं बाहेर काढतो.
advertisement

मालिकेच्या पुढच्या एपिसोडमध्ये काय?

मालिकेच्या पहिल्याच एपिसोडमध्ये मर्डर मिस्ट्री, ड्रामा, हिरोची ढासू एन्ट्री दाखवण्यात आली. मालिकेच्या पुढच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे की, रुद्र गिरीजाच्या भावाला आगीतून बाहेर काढतो. पण भावाला वाचवण्यासाठी गिरीजाने आधीच आगीत उडी घेतलेली असते. भाऊ बाहेर येऊन रुद्रकडे माझ्या बहिणीला वाचव अशी विनंती करतो. रुद्र पुन्हा आगीत जातो आणि गिरिजाला वाचवतो. भणभणत्या आगीत रुद्र आणि गिरिजा पहिल्यांदा एकमेकांसमोर येतात. बेशुद्ध पडलेल्या गिरीजाकडे रुद्र पाहतच राहतो.
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by Star Pravah (@star_pravah)



advertisement
तर दुसरीकडे नागराजची बायको वासंती घाटावर गिरिजाच्या आईवडिलांचं श्राद्ध करते. ती फोटोकडे पाहून म्हणजे, 'देवकी तुला आणि तुझ्या नवऱ्याला माझ्या नवऱ्याने मारलं. तुझी मुलगी जिवंत आहे. ती जिथे कुठे असेल तिथे देवी आईचा आशीर्वाद तिच्या पाठीशी आहे.' याच वेळी गिरिजा नकळत तिथे येते. श्राद्धाच्या विधींवर तिच्या हातून फुल पडतं आणि 25 वर्षांनी पिंडीला कावळा शिवतो. हे पाहून वासंती देखील अवाक् होते. वासंती देवकीच्या फोटोसमोर हात जोडून म्हणते 'नशिबाचा खेळ सुरू झाला आहे.'
advertisement
पुढे गिरिजा धावत असताना तिचा पाय सरकतो आणि पडणाऱ्या गिरिजाचा रुद्र सावरतो. तिथे पुन्हा एकदा दोघांची रोमँटिक भेट आणि नजरानजर होते. मालिकेच्या पहिल्या एपिसोडमध्येच इतका ड्रामा दाखवण्यात आल्याने मालिकेच्या अपकमिंग एपिसोडमध्ये काय होणार याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.   ही मालिका सोमवार - शुक्रवार रात्री 9 वाजता टेलिकास्ट होणार आहे.
मराठी बातम्या/मनोरंजन/
'नशीबवान'चा पहिलाच एपिसोड अन् फुल ऑन ड्रामा! खतरनाक व्हिलन अन् हिरोची फिल्मी स्टाइल एन्ट्री
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement