Nupur Shikhare - Ira Khan Love Story : 5 वर्ष सोबत असून जे नाही घडलं ते लॉकडाऊनमध्ये झालं, नुपूरने आमिरची लेक आयराला कसं पटवलं!

Last Updated:

Nupur Shikhare - Ira Khan Love Story : आयरा आणि नुपूर 5 वर्ष एकत्र होते. पण तरीही ते त्यांच्या मनातील भावना एकमेकांना सांगू शकले नाहीत. 5 वर्षांत त्यांना जे जमलं नाही ते लॉकडाऊनमध्ये झालं. आयरा आणि नुपूर यांची लव्ह स्टोरी हटके आहे.

News18
News18
मुंबई : अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान हिनं मराठमोळी फिटनेस ट्रेनर आणि रनर अॅट अॅथलिट असलेल्या नुपूर शिखरेसोबत लग्न केलं. दोघांचं लग्न खूप चर्चेत आलं होतं. नुपूर हा आमिर खानचा फिटनेस ट्रेनर होता. त्यानंतर तो जवळपास 5 वर्ष आयरा खानला फिटनेसचे धडे देत होता. पण 5 वर्षात नुपूर आणि आयरामध्ये जे घडलं नाही ते लॉकडाऊनमध्ये साध्य झालं.
मित्र म्हणे या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत बोलताना नुपूरने दोघांची लव्ह स्टोरी सांगितली. नुपूर म्हणाला, "मी एक फिटनेस ट्रेनर आहे. रनर अॅट अॅथलिट. 2007 पासून मी फिटनेस ट्रेनर म्हणून काम करतोय. पर्सनल ट्रेनिंग करतो. फ्रिलान्सिंग करतो. 2013च्या आसपास मला आमिर खानला ट्रेन करायची संधी मिळाली. सहा महिने मी त्याला एका प्रोजेक्टमध्ये ट्रेन करत होतो. तो प्रोजेक्ट झाल्यानंतर पुन्हा माझं माझं काम सुरू झालं."
advertisement

आमिरचा फिटनेस ट्रेनरमधून सुरू झाला प्रवास 

नुपूरने पुढे सांगितलं, "2015मध्ये मला आमिर खानच्या ऑफिसमधून पुन्हा फोन आला. मला वाटलं की पुन्हा काही तरी प्रोजेक्ट असेल किंवा ट्रेनिंग असेल. तेव्हा भेटले आणि सांगितलं की माझ्या मुलीसाठी मी ट्रेनर बघतोय. मी 2015 पासून आयराला ट्रेन करतोय. 2015 ते 2020मध्ये ऑन अँड ऑफ तिची ट्रेनिंग सुरू होती. ती शिकायला गेली होती तेव्हा कधी कधी ऑनलाइन ट्रेनिंग व्हायची. ऑन अँड ऑफ होतं पण कॉन्स्टंट एक सुरू होतं."
advertisement

आयरा आणि नुपूरची भेट 

"2019-20च्या असपास आम्ही मित्र झालो. 2019च्या एंडला तिने एक प्ले केला होता. तेव्हा त्यांच्या कलाकारांना मी मदत करतो होतो. बॅकस्टेजला त्यांना मदत करत होतो. त्यावेळेस आम्ही खूप चांगले फ्रेंड झालो, थोडे क्लोज आलो. त्यानंतर आम्ही डेटिंग सुरू केली. आमच्यात साडेबारा वर्षांचा फरक आहे. ती तिचं आयुष्य जगत होती मी माझं आयुष्य जगत होते. ती खूप ट्रिकी स्टेज होती. मी तिच्या वडिलांना ट्रेन करत होतो. एक प्रोफेशनलिझन, एक जबाबदारी असते. पण ऑरगॅनिकली गोष्टी झाल्यानंतर ठीक होतं."
advertisement

लॉकडाऊनमध्ये ऑनलाइन डेटिंग 

नुपूरने सांगितलं, "2020मध्ये आम्ही डेट करायला लागलो. लॉकडाऊन झालं. ती तिच्या घरी, माझी आई आणि मी दादरच्या घरात होतो. त्यावेळेस ऑनलाइन डेट्स, ती तिच्या लॅपटॉपवर मी माझ्या लॅपटॉपवर, एकच मुव्ही, एकत्र सुरू करून रात्रभर बघणं, मग ती तिच्या घरी कॉफी, मी माझ्या घरी कॉफी अशा डेट्स आम्ही केल्या."
advertisement
"पहिला लॉकडाऊन खूप स्ट्रिक्ट होता. त्याच्या 6-7 महिने आधी बाबा गेले होते. लॉकडाऊन उघडल्यानंतर त्यांनी सायकलिंग, रनिंग अलाउट केलं होतं. मग मी आयराला भेटायला धावत इकडे यायचो आणि धावत परत जायचो. सगळ्या गोष्टी पूर्ववत झाल्यानंतर आम्ही प्रॉपर डेटिंगला सुरूवात केली. त्यानंतर आम्हाला कळलं की हे सीरियस आहे."
advertisement

लेकीच्या अफेअरवर आमिर खानची प्रतिक्रिया

आमिर खानचं काय म्हणणं होतं असं विचारल्यानंतर नुपूर हसत हसत म्हणाला की, "त्यांनीच मला तेव्हा सिलेक्ट केलं होतं. त्यांनी विचारलं की, बताओ भाई तुम लोगोका कैसे क्या हुआ? तेव्हा मीच मजेत म्हणालो होतो की, तुम्हीच म्हणालात." नुपूरने सांगितलं, "मी आयराच्या आईशी खूप क्लोज आहे. बाबा आहे. बाकीची फॅमिली, जुनैद. मी त्यांच्याबरोबर खूप कम्फर्ट फील करतो. त्यामुळे कधी काय वाटलं नाही. त्यांनाही पहिल्यापासून हे वाटलं होतं की हे सीरियस आहे."
मराठी बातम्या/मनोरंजन/
Nupur Shikhare - Ira Khan Love Story : 5 वर्ष सोबत असून जे नाही घडलं ते लॉकडाऊनमध्ये झालं, नुपूरने आमिरची लेक आयराला कसं पटवलं!
Next Article
advertisement
Guess Who: गावात शेण गोळा करुन भरायचा पोट, आता करोडपती स्टार; 7 स्टार हॉटेलमध्ये करतो पार्ट्या
गावात शेण गोळा करुन भरायचा पोट, आता करोडपती; 7 स्टार हॉटेलमध्ये करतो पार्ट्या
    View All
    advertisement