advertisement

Allu Arjun: झुकेगा नहीं...! पण पोलीस ठाण्यात 'पुष्पा' रडला; 4 तासांत अल्लू अर्जुनसोबत काय घडलं?

Last Updated:

Allu Arjun: 'पुष्पा 2' प्रिमिअरवेळी संध्या थिएटरमध्ये चेंगराचेंगरी झाली. या प्रकरणी अल्लू अर्जुन सध्या निशाण्यावर आहे. त्याच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चाललेल्या पहायला मिळत आहेत.

पोलीस ठाण्यात 'पुष्पा' रडला
पोलीस ठाण्यात 'पुष्पा' रडला
मुंबई : 'पुष्पा 2' प्रिमिअरवेळी संध्या थिएटरमध्ये चेंगराचेंगरी झाली. या प्रकरणी अल्लू अर्जुन सध्या निशाण्यावर आहे. त्याच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चाललेल्या पहायला मिळत आहेत. या प्रकरणात काल अल्लू अर्जुनची चौकशी झाली. यावेळी अल्लू अर्जुन भावूक झाल्याचं समोर आलंय.
अभिनेता अल्लू अर्जुन आणि त्याचे वडील अल्लू अरविंद आणि वकिलांसह सकाळी 11 वाजता चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात पोहोचले. दुपारी 2.45 वाजता ते पोलीस स्टेशनमधून बाहेर पडले. सुमारे चार तास चाललेल्या चौकशीदरम्यान, पोलिसांनी अभिनेत्याला काही प्रश्न विचारले, व्हिडीओ दाखवण्यात आले यादरम्यान तो भावूक झाला.
advertisement
डीसीपी अक्षांश यादव यांच्यासह पोलिसांच्या पथकाने अल्लू अर्जुनची चौकशी केली. चौकशीदरम्यान अभिनेत्याला त्याच्या वैयक्तिक सुरक्षेबद्दलही विचारण्यात आले आणि बाऊन्सर्सनी त्याच्या चाहत्यांना कथितपणे धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आला, ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली. अल्लू अर्जुनचे वकील अशोक रेड्डी यांनी सांगितले की, अभिनेत्याने पोलिसांना पूर्ण सहकार्य केले आणि गरज पडल्यास ते त्यांना पुन्हा कॉल करतील.
advertisement
चेंगराचेंगरीचा व्हिडिओ पाहून अल्लू अर्जुन भावूक झाला. गुलटे यांच्या म्हणण्यानुसार, अल्लू अर्जुन चौकशीदरम्यान भावूक झाला होता. 'पुष्पा 2' अभिनेत्याची सुमारे चार तास चौकशी करण्यात आली आणि संध्या थिएटरमधील 'पुष्पा 2' प्रिमिअरदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीचे व्हिडिओ दाखवण्यात आले. व्हिडिओ पाहताना, श्रीतेज आणि रेवती जखमी झाल्याचे दृश्य पाहून अल्लू अर्जुन भावूक झाला.
advertisement
दरम्यान, 4 डिसेंबर रोजी हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आणि तिचा आठ वर्षांचा मुलगा जखमी झाला, त्याला नंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी अभिनेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला हैदराबाद पोलिसांनी 13 डिसेंबर रोजी अटक केली होती. तेलंगणा उच्च न्यायालयाने त्याच दिवशी अभिनेत्याला चार आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला होता आणि 14 डिसेंबरला सकाळी त्याची तुरुंगातून सुटका झाली.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Allu Arjun: झुकेगा नहीं...! पण पोलीस ठाण्यात 'पुष्पा' रडला; 4 तासांत अल्लू अर्जुनसोबत काय घडलं?
Next Article
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement