advertisement

Allu Arjun: अल्लू अर्जुनच्या अडचणी संपता संपेना, आता 'पुष्पा 2'च्या दिग्दर्शकानेच घेतला मोठा निर्णय!

Last Updated:

Allu Arjun stampede case: पुष्पा 2'च्या रिलीजच्या दिवशी संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीसाठी अल्लू अर्जुन वादात सापडलाय. या प्रकरणी आज त्याची चौकशीही झाली.

 आता 'पुष्पा 2'च्या दिग्दर्शकानेच घेतला मोठा निर्णय!
आता 'पुष्पा 2'च्या दिग्दर्शकानेच घेतला मोठा निर्णय!
मुंबई : 'पुष्पा 2'च्या रिलीजच्या दिवशी संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीसाठी अल्लू अर्जुन वादात सापडलाय. या प्रकरणी आज त्याची चौकशीही झाली. अल्लू अर्जुनच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या असून दुसरीकडे पुष्पा 2 च्या दिग्दर्शकाने मोठा निर्णय घेतलाय.
संध्या थिएटरमध्ये एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी अल्लू अर्जुनला 13 डिसेंबर रोजी अटक केली होती आणि सध्या तो उच्च न्यायालयाने अंतरिम जामिनावर बाहेर आहे. या सगळ्यात काँग्रेस नेत्याच्या तक्रारीनंतर अल्लू अर्जुन आणि 'पुष्पा 2'चे निर्माता आणि दिग्दर्शक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या सर्व गोष्टींचा चित्रपट दिग्दर्शक सुकुमार यांच्यावर खोलवर परिणाम झाला.
advertisement
अलीकडेच, दिग्दर्शक सुकुमारचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये ते सिनेमा सोडू इच्छित असल्याचे सांगत आहे. होय, तुम्ही ते बरोबर वाचलं आहे. 'पुष्पा 2' दिग्दर्शक एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आला होता, जिथे त्याला विचारण्यात आलं की, त्याला कोणती गोष्ट सोडायची आहे? या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ‘फिल्म्स’ म्हणत उपस्थित सर्वांना आश्चर्यचकित केलं.
advertisement
दरम्यान, ‘पुष्पा 2’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘पुष्पा 2’ ने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली आहे. या चित्रपटाने देशात आणि जगात प्रचंड कमाई केली आहे. सुकुमारच्या ‘पुष्पा’ फ्रँचायझीच्या या दुसऱ्या चित्रपटाने ‘RRR’, ‘जवान’ आणि ‘पठाण’ सारख्या चित्रपटांनाही मात दिली आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Allu Arjun: अल्लू अर्जुनच्या अडचणी संपता संपेना, आता 'पुष्पा 2'च्या दिग्दर्शकानेच घेतला मोठा निर्णय!
Next Article
advertisement
महाराष्ट्राच्या राजकारणात Deputy Chief Minister इतके पावरफुल का? संविधानात अधिकार शून्य, पण पॉवर अफाट; उपमुख्यमंत्री का ठरतो किंगमेकर!
राज्यात उपमुख्यमंत्री इतके पावरफुल का? संविधानात अधिकार शून्य, पण पॉवर अफाट
  • उपमुख्यमंत्री पण मुख्यमंत्र्यांचा तोडीस तोड

  • 'डेप्युटी सीएम' पदाची खरी ताकद नेमकी कशात

  • 'उपमुख्यमंत्री' पदाबद्दल काय सांगतं भारताचं संविधान

View All
advertisement