Pushpa 2 Stampede Case : अल्लू अर्जुनची पोलिसांकडून चौकशी, 2 तासात विचारले 'हे' 8 प्रश्न
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Pushpa 2 Stampede Case : 4 डिसेंबर रोजी झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी अल्लू अर्जुनला 13 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले.
मुंबई : पुष्पा 2 च्या प्रीमियरदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी पोलिसांनी अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याच्या चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आलेत. त्यानुसार आज सकाळी अल्लू अर्जुन हैद्राबाद पोलीस स्थानकात चौकशीसाठी पोहोचला. तब्बल 2 तास अल्लू अर्जुनची चौकशी केली करण्यात आली. पोलिसांनी अल्लू अर्जुनला विचारले की तो घटनास्थळी उपस्थित होता का? यासह आणखी सात प्रश्न विचारले.
22 डिसेंबर रोजी हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातील काही लोकांनी अल्लू अर्जुनच्या घराबाहेर तोडफोड करण्यात आली. त्यामुळे पोलिसांनी अल्लू अर्जुनच्या नातेवाईकांचा सतर्क केलं आहे. अल्लूच्या घराबाहेर बॅरिकेडिंगही करण्यात आले. याप्रकरणी 8 आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यापैकी 6 जणांना 23 डिसेंबर रोजी जामीन मंजूर करण्यात आला.
advertisement
पोलिसांनी 8 प्रश्न विचारले
- तुला संध्या थिएटरच्या प्रीमियर शोला येण्याची परवानगी होती का?
- संध्या थिएटरमध्ये येऊ नका असे व्यवस्थापनाने तुम्हाला आधी सांगितले होते का?
- पोलिसांनी कार्यक्रमाला मान्यता दिली नाही हे तुम्हाला माहीत आहे का? याबाबत माहिती घेतली नाही का?
- तुम्ही आणि तुमच्या पीआर टीमने पोलिसांकडून क्लिअरन्स घेतला होता का?
- संध्या थिएटरच्या आजूबाजूच्या परिस्थितीबद्दल तुमच्या पीआर टीमने तुम्हाला आधीच माहिती दिली होती की नाही?
- तुम्ही तिथे किती बाऊन्सर लावले?
- त्यावेळी घटनास्थळी काय परिस्थिती होती?
- घटनेच्या वेळी तुम्ही हजर होता का आणि जर होय, तर तुम्ही परिस्थिती कशी हाताळली?
advertisement
चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या महिलेचा पती भास्कर हा अल्लू अर्जुन याच्याविरुद्धचा खटला मागे घेण्यास तयार आहे. ते अल्लू अर्जुनला या घटनेत दोषी मानत नाहीत. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, भास्करने सांगितले की, त्यांना त्यांच्या मुलाच्या उपचारासाठी अभिनेत्याकडून पूर्ण सहकार्य मिळाले आहे. घटनेच्या दुसऱ्या दिवसापासून अल्लू आम्हाला साथ देत आहे. हा अपघात आमचे दुर्दैव आहे. अभिनेत्याच्या अटकेसाठी आमच्यावर आरोप झाले, पण आमच्यात लढण्याची ताकद नाही.
advertisement
#WATCH | Actor Allu Arjun leaves from Chikkadpally police station in Hyderabad.
Allu Arjun appeared before Hyderabad police in connection with the Sandhya theatre incident. pic.twitter.com/SMgTCQWOQM
— ANI (@ANI) December 24, 2024
4 डिसेंबर रोजी झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी अल्लू अर्जुनला 13 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता अटक करण्यात आली होती. अटकेनंतर त्याला 4 वाजता स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले, तेथून त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. अल्लूने अंतरिम जामीनासाठी तेलंगणा उच्च न्यायालयात अपील केले होते, त्याला 50,000 रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला. दरम्यान, अल्लूला चंचलगुडा मध्यवर्ती कारागृहात नेण्यात आले. दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी 6.30 च्या सुमारास या अभिनेत्याची चंचलगुडा मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात आली. या काळात अल्लू तब्बल 18 तास कोठडीत होता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 24, 2024 3:22 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Pushpa 2 Stampede Case : अल्लू अर्जुनची पोलिसांकडून चौकशी, 2 तासात विचारले 'हे' 8 प्रश्न