Filmfare Marathi Award 2025: प्राजक्ता माळीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा मिळाला फिल्मफेअर
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Filmfare Marathi Award 2025: सर्वात प्रतिष्ठित आणि मानाचा समजला जाणारा ‘फिल्मफेअर मराठी 2025’ पुरस्कार सोहळा नुकताच मोठ्या थाटामाटात पार पडला.
मुंबई : सर्वात प्रतिष्ठित आणि मानाचा समजला जाणारा ‘फिल्मफेअर मराठी 2025’ पुरस्कार सोहळा नुकताच मोठ्या थाटामाटात पार पडला. यंदाचा पुरस्कार सोहळा केवळ मराठी कलाकारांसाठी नव्हता, तर बॉलिवूडमधील मोठ्या सेलिब्रिटींचीही उपस्थिती विशेष आकर्षण ठरली. फिल्मफेअरच्या दहाव्या वाढदिवसामुळे हा आणखीनच चर्चेत राहिला.
कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सिद्धार्थ चांदेकर आणि अमेय वाघ यांनी आपल्या खास शैलीत केलं. या वर्षीचे पुरस्कार काही ठराविक चित्रपटांनी अक्षरशः गाजवले. ‘पाणी’ आणि ‘फुलवंती’ हे चित्रपट सर्वाधिक पुरस्कारांचे मानकरी ठरले. यातच सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्राजक्ता माळीला मिळाला.
'फिल्मफेअर मराठी 2025' अवॉर्ड लिस्ट
advertisement
सर्वोत्कृष्ट चित्रपट – पाणी
सर्वोत्कृष्ट अभिनेता – महेश मांजरेकर (जुनं फर्निचर)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – प्राजक्ता माळी (फुलवंती) आणि वैदेही परशुरामी ( एक दोन तीन चार )
सर्वोत्कृष्ट चित्रपट ( परीक्षक पसंती ) – गाठ
सर्वोत्कृष्ट अभिनेता ( परीक्षक पसंती ) – जितेंद्र जोशी – गाठ
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ( परीक्षक पसंती ) – राजश्री देशपांडे – सत्यशोधक
advertisement
सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्री – जुई भागवत – लाइक अँड सबस्क्राईब
सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेता – धैर्य घोलप – एक नंबर
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – क्षितीश दाते (धर्मवीर 2)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – नम्रता संभेराव (नाच गं घुमा)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – आदिनाथ कोठारे (पाणी)
सर्वोत्कृष्ट गायिका – वैशाली माडे - फुलवंती ( मंदनमंजिरी )
advertisement
सर्वोत्कृष्ट गायक – राहुल देशपांडे – अमलताश
सर्वोत्कृष्ट म्युझिक अल्बम 2025 – फुलवंती
सर्वोत्कृष्ट संवाद – महेश मांजरेकर – जुनं फर्निचर
फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार – उषा मंगेशकर
सर्वोत्कृष्ट स्क्रीनप्ले – नितीन दीक्षित – पाणी
सर्वोत्कृष्ट कथा – गाठ चित्रपट
सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शक – नवज्योत बांदिवडेकर – ‘घरत गणपती’ आणि राहुल पवार
advertisement
सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाइन – एकनाथ कदम – फुलवंती
सर्वोत्कृष्ट संगीत – अनमोल भावे – पाणी
सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाइन – फुलवंती
सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफर – उमेश जाधव – फुलवंती
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत – गुलराज सिंग – पाणी
advertisement
फिल्मफेअर मराठी 2025 हा सोहळा केवळ पुरस्कारांचा नव्हे, तर मराठी सिनेमाच्या यशाचा आणि समृद्धतेचा उत्सव ठरला. नव्या दमाच्या कलावंतांपासून ते ज्येष्ठ कलाकारांपर्यंत सगळ्यांचा गौरव झाल्यामुळे हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या मनात कायमचा कोरला गेला.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 11, 2025 3:17 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Filmfare Marathi Award 2025: प्राजक्ता माळीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा मिळाला फिल्मफेअर