Pushpa 2 OTT Release Date : पुष्पा 2 ओटीटीवर येतोय! जे थिएटरमध्ये दाखवलं नाही ते मोबाईलमध्ये दिसणार

Last Updated:

Pushpa 2 OTT Release Date : अल्लू अर्जुनचा हा मेगा ब्लॉकबस्टर सिनेमा तुम्ही OTT वर केव्हा आणि कुठे पाहू शकता. पुष्पा2ची रिलीज डेट समोर आली आहे. 

पुष्पा 2 ओटीटी रिलीज डेट
पुष्पा 2 ओटीटी रिलीज डेट
मुंबई : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2: द रुल' हा चित्रपट 5 डिसेंबरला थिएटरमध्ये दाखल झाला. हा चित्रपट प्रदर्शित होऊन 53 दिवस उलटूनही देशात आणि जगभरात धुमाकूळ घालत आहे. थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता पुष्पा 2 ओटीटीवर कधी येणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. सिनेमाच्या ओटीटी रिलीजची सगळेच वाट पाहत आहेत. अशातच 'पुष्पा 2: द रुल'च्या ओटीटी रिलीजची वाट पाहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.  अल्लू अर्जुनचा हा मेगा ब्लॉकबस्टर सिनेमा तुम्ही OTT वर केव्हा आणि कुठे पाहू शकता. पुष्पा2ची रिलीज डेट समोर आली आहे.

Netflix वर पुष्पा 2 कधी रिलीज होणार?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'पुष्पा 2' 30 ते 31 जानेवारी 2025 दरम्यान OTT प्लॅटफॉर्म Netflix वर रिलीज होण्याची शक्यता आहे. चित्रपटाचे थिएटरनंतरचे डिजिटल अधिकार नेटफ्लिक्सने मोठ्या किमतीत विकत घेतले आहेत.निर्मात्यांनी काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती की पुष्पा 2हा 56 दिवसांची विंडो पूर्ण केल्यानंतर थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. अशा परिस्थितीत आता चित्रपटाने ही विंडो पूर्ण केल्याने ओटीटीवर तो प्रदर्शित होण्याची शक्यता बळावली आहे.
advertisement
असेही वृत्त आहे की नेटफ्लिक्स पुष्पा 2 चा एक्सक्लुझिव्ह एक्स्टेंडेड कट रिलीज करणार आहे, म्हणजेच त्यात 20 मिनिटांचे न पाहिलेले फुटेज देखील समाविष्ट असेल. मात्र निर्मात्यांनी याबाबत अधिकृतपणे काहीही जाहीर केलेले नाही.
advertisement

पुष्पा 2 बॉक्स ऑफिस कलेक्शन

'पुष्पा 2' हा देशातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. रिलीजच्या 53 दिवसांत भारतीय बॉक्स ऑफिसवर 1232.30 कोटी रुपयांची कमाई केली आहे. जगभरात या चित्रपटाने 1800 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. दंगलचा रेकॉर्ड मोडण्यासाठी हा चित्रपट अवघ्या काही कोटींनी कमी आहे. सध्या, पुष्पा 2 हा जगभरात सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट आहे.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Pushpa 2 OTT Release Date : पुष्पा 2 ओटीटीवर येतोय! जे थिएटरमध्ये दाखवलं नाही ते मोबाईलमध्ये दिसणार
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement