Pushpa 2 : थिएटर, ओटीटीनंतर आता 'पुष्पा 2' टीव्हीवर येणार, अल्लू अर्जुनचा सिनेमा कधी आणि कुठे पाहता येणार?
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Pushpa 2 On TV:‘पुष्पा नाम सुनके Flower समजे क्या, Fire है मैं’ या डायलॉगप्रमाणेच या सिनेमानेही प्रेक्षकांची मने जिंकली.
मुंबई : ‘पुष्पा नाम सुनके Flower समजे क्या, Fire है मैं’ या डायलॉगप्रमाणेच या सिनेमानेही प्रेक्षकांची मने जिंकली. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाच्या सिनेमाने थिएटर, ओटीटीवरही धुमाकूळ घातला. बॉक्स ऑफिसवर सिनेमाने कमाईचे रेकॉर्डही मोडले. अशातच आता हा सिनेमा टीव्हीवर धुमाकूळ घालण्यास सज्ज झाला आहे. त्यामुळे अल्लू आणि रश्मिकाच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
5 डिसेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये आलेला हा ब्लॉकबस्टर चित्रपट आता घरबसल्या बघायला मिळणार आहे. 13 एप्रिलपासून विविध भाषांमध्ये टीव्ही प्रीमियर होणार आहे.
'पुष्पा २' कधी, कुठे बघता येईल?
तेलुगू भाषेत: 13 एप्रिल, संध्याकाळी 5:30 वाजता – Star Maa
मल्याळम भाषेत: 13 एप्रिल, संध्याकाळी 6:30 वाजता – Asianet
कन्नड भाषेत: 13 एप्रिल, संध्याकाळी 7 वाजता – Colors Kannada
advertisement
तमिळ भाषेत: 14 एप्रिल, दुपारी 3 वाजता – Star Vijay
हिंदी प्रेक्षकांना मात्र अजून थांबावं लागेल. कारण टीव्हीवर हिंदी आवृत्तीची तारीख अजून जाहीर झालेली नाही.
दरम्यान, ‘पुष्पा २: द रुल’ हा 2021 मध्ये आलेल्या ‘पुष्पा: द रायझ’चा सिक्वेल आहे. याचे दिग्दर्शन पुन्हा एकदा सुकुमार यांनीच केलंय. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना या जोडीने पुन्हा धमाका केला. साऊथ इंडस्ट्रीत ‘पुष्पा 2’ हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 13, 2025 8:05 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Pushpa 2 : थिएटर, ओटीटीनंतर आता 'पुष्पा 2' टीव्हीवर येणार, अल्लू अर्जुनचा सिनेमा कधी आणि कुठे पाहता येणार?