Pushpa 2 Movie Review: पुष्पा 2 का पाहावा? पार्ट 1 पेक्षा का आहे भारी? मुंबईकर फॅनचा FIRST REVIEW
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Nikita Tiwari
Last Updated:
Pushpa 2: The Rule Movie Review in Marathi: अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांचा बहुचर्चित पुष्पा 2 द: रुल हा चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित झाला. मुंबईतील चाहत्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया पाहू.
निकिता तिवारी, प्रतिनिधी, मुंबई: अभिनेता अल्लू अर्जून आणि रश्मिका मंदाना यांचा बहुचर्चित पुष्पा 2 हा सिनेमा आज 5 डिसेंबरला मुंबईसह सर्वत्र प्रदर्शित झाला. दिग्दर्शक सुकुमारन यांच्या चित्रपटाचा पहिलाच शो हाऊसफुल्ल झाला असून चाहत्यांना चित्रपट खूप आवडला आहे. मुंबईतील सिनेमागृहांत देखील चाहत्यांनी पुष्पा 2 या चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटाचा पहिला शो संपताच लोकल18 ने गोरेगाव येथील चित्रपटगृहातील प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.
प्रेक्षकांनी चित्रपटाची स्तुती करताना सांगितलं की, “अल्लू अर्जुन आणि रश्मिका ही जोडी कमालच आहे, पण त्याशिवाय सिनेमातील त्यांचं काम देखील दमदार आहे. फाहाद फसिल या चित्रपटात एक धमाकेदार एन्ट्री घेऊन आला आहे. याशिवाय चित्रपटामध्ये गाणी, ॲक्शन, ड्रामा या सगळ्यांचं एकदम परफेक्ट टायमिंग जुळून आलं आहे.”
advertisement
अल्लू अर्जुनने चित्रपटासाठी घेतलेले कष्ट चित्रपटात दिसले आहेत. त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर अधिक मेहनत घेऊन काम केलंय. ती चित्रपटात दिसली आहे. त्यातील एक सिन मला सर्वाधिक आवडला. हा चित्रपट प्रत्येकानं पाहावा असाच असून सर्वांनी चित्रपटगृहांतच हा चित्रपट पाहावा, असं एक चाहता म्हणाला. तर चित्रपट पूर्ण वेळ खिळवून ठेवतो. या चित्रपटात एक ट्विस्ट असून आता तिसऱ्या भागाची प्रतीक्षा असल्याचं एका चाहत्यानं सांगितलं.
advertisement
दरम्यान, पुष्पा चित्रपटाच्या यशानंतर चाहते पुष्पा 2 या चित्रपटाची वाट पाहत होते. चित्रपट प्रदर्शीत होण्यापूर्वीच 100 कोटींची कमाई चित्रपटाने केली होती. त्यामुळे सर्वांचं लक्ष पुष्पा 2 च्या प्रदर्शनावर होतं. आज पहिलाच शो हाऊसफुल्ल झाला असून चित्रपटाचं ऍडव्हान्स बुकींग जोरात सुरू आहे. अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फासिल यांच्या मुख्य भूमिका असलेला चित्रपट पाहण्यासाठी आज फर्स्ट डे फर्स्ट शो पासून चाहत्यांनी गर्दी केलीये.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 05, 2024 1:47 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Pushpa 2 Movie Review: पुष्पा 2 का पाहावा? पार्ट 1 पेक्षा का आहे भारी? मुंबईकर फॅनचा FIRST REVIEW








