Pushpa 3 Confirmed : 'पुष्पा 2' नंतर 'पुष्पा 3' येणार! कधी होणार रिलीज, समोर आली मोठी अपडेट
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Pushpa 3 confirmed : 'पुष्पा 2'साठी प्रेक्षकांना 3 वर्षे वाट पाहावी लागली. मग आता तिसऱ्या सिक्वेलसाठी किती दिवस वाट पाहावी लागणार असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.
मुंबई : ‘बाहुबली’ आणि ‘केजीएफ’ हे दोन पॅन इंडिया सिनेमानंतर जर कोणत्या सिनेमाची क्रेझ प्रेक्षकांना होती तर तो सिनेमा ‘पुष्पा 2’. हा सिनेमा नुकताच रिलीज जाला आहे. 2024 चा बहुप्रतिक्षीत सिनेमा वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात रिलीज झाला आहे. या सिनेमाने पहिल्याच दिवशी 100 कोटींचा गल्ला पार केला आहे. 'पुष्पा 2' पाहण्यासाठी गेलेल्या लोकांना एक मोठा सरप्राईज मिळालं आहे. पुष्पा झाला पुष्पा 2 आला आता पुष्पा 3 तिसरा सिक्वेल म्हणजेच 'पुष्पा 3' देखील पडद्यावर येणार हे निश्चित झाले. 'पुष्पा 2'साठी प्रेक्षकांना 3 वर्षे वाट पाहावी लागली. मग आता तिसऱ्या सिक्वेलसाठी किती दिवस वाट पाहावी लागणार असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.
‘पुष्पा २: द रुल’मधून सुरू झालेला ‘पुष्पराज’चा प्रवास इथेच संपणार नाहीये. 'पुष्पा: द रॅम्पेज' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'पुष्पा 2' च्या शेवटी सिनेमाच्या तिसऱ्या पार्टची घोषणा करण्यात आली आहे. तिसऱ्या भागाचं शीर्षक 'पुष्पा : द रॅम्पेज' असं असणार आहे.
advertisement
GreatAndhra मधील एका वृत्तानुसार, पुष्पाच्या तिसऱ्या पार्टआधी अल्लू अर्जुनला त्रिविक्रमसोबतचे आगामी दोन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या सिनेमांचं प्रोडक्शन 2028-2029 मध्ये सुरू होणार आहे. 'पुष्पा 3' चं प्रोडक्शन सुरू होण्यासाठी किमान चार वर्षे लागतील. त्यामुळे ‘पुष्पा: द रॅम्पेज’चे शूटिंग 2028 किंवा 2029 मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.
advertisement
विजय देवरकोंडा 'पुष्पा 3' मध्ये एंट्री घेणार आहे. तिसऱ्या सिक्वेलमध्ये अल्लू अर्जुनसोबत विजय देवरकोंडा पडद्यावर दिसणार असल्याचं बोललं जात आहे. 2022 मध्ये 'अर्जुन रेड्डी' स्टार विजय देवरकोंडाने त्याच्या ट्विटमध्ये 'पुष्पा 3' चा उल्लेख केला होता. 'द राइज', 'द रुल' आणि 'द रॅम्पेज' या तीन सिनेमांची नावं त्याने सांगितली होती.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 05, 2024 2:01 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Pushpa 3 Confirmed : 'पुष्पा 2' नंतर 'पुष्पा 3' येणार! कधी होणार रिलीज, समोर आली मोठी अपडेट









