वेशांतर करून कल्याण फास्ट ट्रेनमध्ये चढला आर माधवन? पाहून सगळेच अवाक्; म्हणाले, 'अब्बा नही मानेंगे' VIDEO

Last Updated:

कल्याण फास्ट ट्रेनमध्ये अभिनेता आर माधवन चढला? ट्रेनमधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

News18
News18
कलाकार म्हटले की ते त्यांच्या आलिशान गाड्यांमधून फिरतात. फार कमी कलाकार आहेत जे रस्त्याने चालताना दिसतात. ते कायमच चाहत्यांपासून आणि गर्दीपासून दूर असल्याचं पाहायला मिळतं. फेमस अभिनेता जर गर्दीच्या ट्रेनमध्ये चढला तर! मुंबई लोकलमधील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी भांडणांचे, तर कधी भजनांचे. हल्ली तर लोकल ट्रेनमध्ये केळवण देखील केलं जातं. मुंबई लोकल ट्रेनमध्ये असाच एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात अभिनेता आर माधवन दिसतोय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
कल्याण फास्ट लोकलमध्ये अभिनेता आर माधवन चढला, असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. आज फरहान मिल गया कल्याण फास्ट मे असं म्हणत एका इन्स्टाग्राम युझरने व्हिडीओ शेअर केला आहे. त्याचे केस डोळ्यांवर आले आहेत. त्याने खांद्याला बॅग लावली आहे आणि हातात फोन आहे.
advertisement
व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यात दिसणारी ही व्यक्ती आर माधवन सारखी दिसतेय पण तो आर माधवन नाहीये. एकसारखी दिसणारी सात माणसं असतात असं म्हणत. ही व्यक्ती आर माधवनसारखी दिसतेय. त्याला पाहून चाहत्यांना थ्री इडियट्समधील आर माधवनचं फरहान हे कॅरेक्टर आठवलं. फरहानला वाईल्ड लाइफ फोटोग्राफर बनायचं असतं, पण त्याचा अब्बा त्याला परवानगी देत नाहीत. ट्रेनमधील माणसाला पाहून चाहत्यांनी फरहानला आठवून धम्माल कमेंट्स केल्या आहेत.
advertisement
advertisement
एका युझरने लिहिलंय, "अब्बा मान गये?" दुसऱ्याने लिहिलं, "बॅगमध्ये DSLR असेल". आणखी एकाने लिहिलंय, "चिल गाइज, कर्जत के रेन फॉरेस्टमध्ये सूट करून परत आलाय." तर आणखी एका लिहिलंय, "वाइल्ड लाइफ फोटोग्राफी सोडून इंजिनिअरींमध्ये वापसी."
आर माधवनचा 'थ्री इडियट्स' हा सिनेमा त्याच्या अभिनय कारकि‍र्दीतला सर्वात गाजलेला सिनेमा आहे. या व्हिडीओ दिसणारी व्यक्ती आर माधवन नसली तरी चाहत्यांना मात्र आर माधवनचं कॅरेक्टर त्यात दिसलं. फरहान या कॅरेक्टरवर प्रेक्षकांचं आजही किती प्रेम आहे हे दिसून आलं.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
वेशांतर करून कल्याण फास्ट ट्रेनमध्ये चढला आर माधवन? पाहून सगळेच अवाक्; म्हणाले, 'अब्बा नही मानेंगे' VIDEO
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement