इतका संयम खुद्द आई-वडीलही ठेवणार नाही... चालू नाटकात मुलगी सतत रडत होती, अभिनेत्यानं काय केलं एकदा पाहाच, VIDEO

Last Updated:

'गोष्ट तिच्या घटस्फोटाची' नाटकात राजन ताम्हाणे यांनी लहान मुलीच्या रडण्याचा आवाज आला. नाटकातील अभिनेत्यानं मध्येच प्रयोग थांबवला. त्यानंतर त्याने जे केलं ते पाहून प्रेक्षकांनी त्यांचं कौतुक केलं आहे. त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

News18
News18
नाटकाचा प्रयोग सुरू असताना प्रेक्षकांमधून होणारा गोंधळ हा कलाकारांसाठी नेहमीच त्रासदायक ठरतो. कधी मोबाइलची रिंग वाजते तर कधी प्रेक्षकांमध्ये कुजबुज, कमेंट पास करणं असे प्रकार वारंवार होत असतात. अनेकदा प्रेक्षक आपल्या लहान मुलांना घेऊन येतात आणि मुलं मध्येच रडायला लागतात. अनेकदा अनेक कलाकारांनी प्रेक्षकांना शांतता बाळगण्याचं आवाहन केलं आहे. असाच एक प्रसंग 'गोष्ट तिच्या घटस्फोटाची' या नाटकाच्या प्रयोगादरम्यान घडली. पण हा प्रसंग नाटकातील अभिनेत्यानं ज्या पद्धतीनं हाताळला त्याचं कौतुक होतं..
'गोष्ट तिच्या घटस्फोटाची'चा नाटकाचा 17 मे रोजी शिवाजी मंदिर येथे पहिला प्रयोग पार पडला. या प्रयोगाला प्रेक्षकांची गर्दी केली होती.  नाटकाचा प्रयोग सुरू असताना नाट्यगृहात एका लहान मुलीचा रडण्याचा आवाज सतत घुमत होता. त्यामुळे केवळ कलाकारच नाही तर समोर बसलेले प्रेक्षकही वारंवार विचलित होत होते. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्या नाटकाचे अभिनेते राजन ताम्हाणे यांनी नाटकाचा प्रयोग मध्येच थांबवला.
advertisement
अभिनेते राजन ताम्हाणे यांनी नाटकाचा प्रयोग थांबवला आणि स्टेजवर पुढे येत विनंती केली. "आई वडिलांनी कोणी तरी शांतपणे तिला बाहेर घेऊन जा..." असं सांगितलं.  केवळ एका क्षणासाठी नाटक थांबवल्यानंतर राजन ताम्हाणे यांनी पुन्हा बेअरिंग पकडत नाटक सुरू केलं.  त्यांचा हा संयम, व्यावसायिकता आणि प्रसंगावधानाचं सगळेच कौतुक करत आहेत. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
advertisement
राजन ताम्हणे यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी कमेंट करत त्यांचं कौतुक केलं आहे. एका युझरने लिहिलंय, "त्यांनी जे केलं ते बरोबर होतं. स्टेजवर परफॉर्मन्स करणाऱ्या कलाकारांना माहिती असतं काय होतं." दुसऱ्यानं लिहिलंय, "किती शांतपणे सांगितलं. आणखी एकाने लिहिलंय, तो डायलॉग त्या मुलीच्या आई वडिलांना मारला पाहिजे होता."
advertisement
एका युझरने लिहिलंय, "यात काही चुकीचं नाही. बरोबर आहे डिस्टर्ब होतं." आणखी एकाने लिहिलंय, "किती तरी प्रेक्षक मोबाईल चालू ठेवतात. अगदी विनंती केली तरी. कलाकाराची एकाग्रता भंग होते".
याआधी देखील अनेक मराठी कलाकारांनी नाटकाच्या प्रयोगादरम्यान मोबाईल वाजणे आणि लहान मुलांच्या रडण्याचे आवाज आल्यानंतर नाटक थांबवून शांत राहण्याची विनंती केली आहे. अभिनेता सुबोध भावे आणि सुमीत राघवन, भरत जाधव यांनीही अनेकदा याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
इतका संयम खुद्द आई-वडीलही ठेवणार नाही... चालू नाटकात मुलगी सतत रडत होती, अभिनेत्यानं काय केलं एकदा पाहाच, VIDEO
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement