Rakhi Sawant : 'रावण' बनली राखी सावंत, विचारले असे प्रश्न की सगळ्यांची बोलती बंद, VIDEO

Last Updated:

Rakhi Sawant Ravan on Dussehra : आज दसऱ्यादिवशी राखी सावंतने रावणाचा लूक केला आहे. 'ड्रामा क्वीन'चा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय.

News18
News18
Rakhi Sawant : आज देशभरात दसरा आणि गांधी जयंती साजरी केली जात आहे. हे सण उत्सव साजरे करण्यापासून आपले लाडके बॉलीवूडकर तरी कसे मागे राहतील. आज सकाळपासून इंडस्ट्रीतील कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दसरा आणि गांधी जयंतीच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. अशातच 'ड्रामा क्वीन' राखी सावंतने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. दसऱ्याला राखीचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये राखी सावंत रावणाच्या गेटअपमध्ये गप्पा मारताना दिसत आहे. दरम्यान अभिनेत्री गंमतीत मीडियाला धमक्या देतानाही दिसत आहे. पापराझी राखीला विचारतात की, तिच्या आयुष्यातील कोणता व्यक्ती रामपासून रावण बनला आहे. हा प्रश्न ऐकताच राखी भडकते. त्यानंतर आपल्या हटके स्टाईलमध्ये राखी सावंत मीडियाची शाळा घेताना दिसत आहे.
राखी सावंतचा व्हिडीओ व्हायरल
राखी सावंत व्हिडीओमध्ये म्हणतेय,"तुम्ही आधी स्वत:ला सुधारा. त्यानंतरच मला असे काहीही अर्थ नसलेले प्रश्न विचारा. समजलं का? नाहीतर मी ही गदा फेकून मारेल". राखी सावंत बोलत असताना मागून कोणीतरी म्हणतंय की,"पाहा गब्बर हसतोय". त्यानंतर राखी सावंत गब्बर कुठे आहे? असं विचारताना दिसत आहे. त्यानंतर सर्वजण राखी सावंतच्या वक्तव्यावर हसताना दिसत आहेत. राखीचा हा हटके अंदाज सोशल मीडियावर धमाका करत आहे.
advertisement
दसऱ्यानिमित्त राखी सावंतने रावण लूक केला आहे. तिने रावणाचा दहा तोंडे असलेला मुखवटा घातला आहे. तसेच तिच्या हातात गदाही आहे. राखी सावंत दुबईहून मुंबईत परतली आहे. राखी नुकतीच 'पति पत्नी और पंगा'च्या सेटवर दिसून आली. त्यावेळी राखी 'बिग बॉस 19'ची स्पर्धक तान्या मित्तलची शाळा घेताना दिसून आली. राखी सावंतने ट्रंप आपले वडील असल्याचा दावा केला होता. तसेच दुबईत आपली खूप प्रॉपर्टी असून 'बिग बॉस 19'मध्ये सहभागी होणार असल्याचंही राखी म्हणाली होती.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Rakhi Sawant : 'रावण' बनली राखी सावंत, विचारले असे प्रश्न की सगळ्यांची बोलती बंद, VIDEO
Next Article
advertisement
Guess Who: गावात शेण गोळा करुन भरायचा पोट, आता करोडपती स्टार; 7 स्टार हॉटेलमध्ये करतो पार्ट्या
गावात शेण गोळा करुन भरायचा पोट, आता करोडपती; 7 स्टार हॉटेलमध्ये करतो पार्ट्या
    View All
    advertisement