Rakhi Sawant : राखी सावंतची 'Bigg Boss 19'मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री? दुबई रिटर्न 'ड्रामा क्वीन' म्हणाली...

Last Updated:

Rakhi Sawant : बॉलिवूडची 'ड्रामा क्वीन' अर्थात राखी सावंत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आता राखी सावंत मुंबईत स्पॉट झाली आहे. यावेळी तिने 'बिग बॉस 19'मध्ये सहभागी होण्याबद्दल भाष्य केलं.

News18
News18
Rakhi Sawant : 'बालिका वधू' फेम अभिनेत्री अविका गौर आणि अभिनेता मिलिंद चंदवानी नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. बॉलिवूडकरांच्या उपस्थितीत त्यांचा शाही लग्नसोहळा पार पडला. हिंदी मनोरंजनसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी या लग्नसोहळ्याला उपस्थित होते. पण या लग्नसोहळ्याची शान वाढवली ती बॉलिवूडची 'ड्रामा क्वीन' राखी सावंतने. अविकाच्या लग्नासाठी राखी खास दुबईहून भारतात आली होती. या लग्नसोहळ्यात आपल्या हटके अंदाजाने राखीने उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं. सोशल मीडियावर राखीने लग्नसोहळ्यातील व्हिडीओ व्हायरल होत आहेत. राखी सावंत आता 'बिग बॉस 19'च्या घरात जाण्यासाठी सज्ज आहे. ड्रामा क्वीनने स्वत:चं याबद्दल माहिती दिली आहे. त्यामुळे 'बिग बॉस 19'च्या घरात ड्रामा क्वीन राखी सावंतची वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
बॉलिवूडची 'ड्रामा क्वीन' अर्थात राखी सावंत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आता राखी सावंत मुंबईत स्पॉट झाली आहे. राखी सावंतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये राखीला पुन्हा दुबईला कधी जाणार? असा प्रश्न पापराझी विचारताना दिसत आहेत. पापाराझींना उत्तर देत राखी म्हणतेय,"आता 'बिग बॉस' करुनच जाणार", असं उत्तर राखी देते.
advertisement
नेक दिवसांनी पुन्हा भारतात येऊन राखीला आनंद झाला आहे. चाहत्यांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देत यावेळी भारतावर प्रेम असल्याचंही राखी म्हणाली.

कतरिनानंतर आणखी एक अभिनेत्री देणार गुडन्यूज, 40 व्या वर्षी दुसऱ्यांदा होणार आई?

'BIGG BOSS 19'मध्ये राखी सावंतची वाइल्ड कार्ड एन्ट्री?
राखी सावंत स्वत:ला बिग बॉसची बायको समजते. आजवर अनेकदा "मी 'बिग बॉस'ची बायको असल्याचं ती म्हणाली आहे. सलमान खानच्या बिग बॉसच्या अनेक पर्वांमध्ये राखी सावंतचा सहभाग राहिला आहे. तसेच बिग बॉस मराठीमध्येही ती एकदा सहभागी झाली होती. बिग बॉस आणि राखी सावंत हे एक वेगळच कनेक्शन आहे. 'बिग बॉस'प्रेमींनाही राखी सावंत 'बिग बॉस'च्या घरात आलेली आवडते. अद्याप राखीच्या वाईल्ड कार्ड एन्ट्रीबाबत अधिकृतरित्या काहीही समोर आलेलं नाही.
advertisement
कसा आहे राखीचा लूक?
राखी सावंतने चमचमणारी काळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. चंदेरी रंगाच्या शिमरी दागिण्यांनी तिने आपला लूक पूर्ण केला आहे. राखीचा हा भन्नाट लूक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Rakhi Sawant : राखी सावंतची 'Bigg Boss 19'मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री? दुबई रिटर्न 'ड्रामा क्वीन' म्हणाली...
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement