Ranu Mandal : ना खायला अन्न, घालायला कपडे, डोकंही ठिकाणावर नाही; एका रात्रीत स्टार होणारी व्हायरल रानू मंडल बिकट अवस्थेत

Last Updated:

Ranu Mandal : एका रात्रीत स्टार झालेली राणू मंडल आता अत्यंत बिकट अवस्थेत आहे. 5 वर्षांनी राणू मंडल पहिल्यांदा समोर आली आहे.

News18
News18
रेल्वे स्टेशनवर बसून दिवंगत गायिका लता मंगेशकर यांचं गाणं गाणारी राणू मंडळ आठवतेय. राणू मंडलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि राणू एका रात्रीत स्टार झालं. तिचं आयुष्य एका रात्रीत बदललं. तिच्या आवाजाचं कौतुक झालं. अनेक सेलिब्रेटी येऊन तिला भेटले. तिला मदतीचा हात दिला. गायक हिमेश रेशमियाने तर तिला सिनेमात गाणं दिलं. एका रात्रीत स्टार झालेली राणू मंडल आता अत्यंत बिकट अवस्थेत आहे. 5 वर्षांनी राणू मंडल पहिल्यांदा समोर आलीये.
2019 साली रानू मंडलचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गायक हिमेश रेशमियाने तिला हॅपी हार्डी अँड हीर या चित्रपटात गाण्याची संधी दिली. तिचा आवाज संपूर्ण देशभर गाजला. ती अनेक रिअॅलिटी शोमध्ये दिसली. तिला कमालीचं स्टारडम मिळालं. ही प्रसिद्धी टिकवून ठेवणं तिच्यासाठी खूप अवघड झालं.
advertisement
प्रसिद्धी मिळाल्यानंतर गेल्या काही वर्षांत रानू मंडलचं वागणं बदलल्याचं दिसून आलं होतं. सोशल मीडियावर तिचे चाहत्यांशी वाद घालतानाचे व्हिडिओ समोर आले होते. त्यानंतर राणूच्या स्वभावावर प्रचंड टीका करण्यात आली होती. तिने एका रात्रीत जे मिळवलं ते एका रात्रीच गमावलं. त्यानंतर राणू मंडल लाइमलाइटपासून दूर झाली.
आता 5 वर्षांनी युट्यूबर निशू तिवारीने राणू मंडलची कोलकत्ता येथील राणाघाट येथील घरी जाऊन भेट घेतली. तेव्हा तिची अवस्था पाहून तोही शॉक झाला. तिची अवस्था पहिल्यापेक्षा बिकट झाली आहे. युट्यूबरनं सांगितलं की, तिची अवस्था खूप भीषण आहे. घराच्या भिंतींवर किडे, सगळीकडे कचरा आणि टॉयलेटची दुर्गंधी येत होती. राणूची मानसिक अवस्था ठीक नाही. तिला काही कळत नाही, तिच्या काहीच लक्षातही नाही. ती जे बोलते ते पुढच्या पाच मिनिटांत विसरून जाते.
advertisement
रानू मंडलला प्रसिद्धी मिळाली तेव्हा तिने खूप पैसे कमावले पण या काळात अनेकांना तिची फसवणूकही केली. आता ती पूर्णपणे इतरांवर अवलंबून आहे. तिला भेटायला येणारे लोक तिच्यासाठी जेवण, थोडे पैसे घेऊन येतात. एकेकाळी अमाप प्रसिद्ध मिळवणारी राणू मंडल आज जगण्यासाठी संघर्ष करतेय. तिच्या प्रसिद्धीमागचं वास्तव मन हेलावन टाकणारं आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Ranu Mandal : ना खायला अन्न, घालायला कपडे, डोकंही ठिकाणावर नाही; एका रात्रीत स्टार होणारी व्हायरल रानू मंडल बिकट अवस्थेत
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement