Raj Thackeray Uddhav Thackeray : निवडणूक अधिकाऱ्यांकडे सर्वपक्षीय शिष्टमंडळ, पण धारेवर धरलं ठाकरे बंधूंनी, बैठकीत काय घडलं?

Last Updated:

Raj Thackeray Uddhav Thackeray : मतदार यादींचा घोळ ते व्हीव्हीपॅटच्या मुद्यावर ठाकरे बंधूंनी मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांना धारेवर धरलं.

News18
News18
मुंबई: निवडणूक मतदार यादीतील त्रुटींसह इतर काही प्रक्रियांवर आक्षेप घेत महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ निवडणूक आयुक्तांच्या भेटीसाठी दाखल झाले. राज ठाकरे देखील या शिष्टमंडळात होते. शरद पवार, उद्धव ठाकरे, डॉ. अजित नवले, जयंत पाटील आदींच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली. पण, या बैठकीत ठाकरे बंधू आक्रमक झाल्याचे दिसून आले. मतदार यादींचा घोळ ते व्हीव्हीपॅटच्या मुद्यावर ठाकरे बंधूंनी मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांना धारेवर धरलं. मनसेसह महाविकास आघाडीने संयुक्त निवेदन सादर करताना काही मागण्या केल्या. मात्र, आज बैठकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी इतर नेत्यांसह निवडणूक आयोगावर प्रश्नांची सरबत्ती केली.
advertisement
मतदारयादीसह प्रभाग रचना आणि इतर मुद्यांवरून आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम आणि मुख्य निवडणूक आयुक्त यांची भेट मविआच्या शिष्टमंडळाने घेतली. दोन वेगवेगळ्या शिष्टमंडळांकडून मुख्य निवडणूक अधिकारी आणि मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्यासमोर महाविकास आघाडीच्या पहिल्या फळीच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली.
advertisement

ठाकरे बंधू आक्रमक...

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांच्या भेटीआधी उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यासह मविआचे नेते ठाकरे गटाचे कार्यालय शिवालय येथे जमले. या ठिकाणी छोटी बैठक झाली. यातच चर्चेबाबत रणनीती आखण्यात आली. या बैठकीनंतर उद्धव आणि राज ठाकरे हे एकत्रितपणे कारमधून प्रवास केला. बैठकीच्या सुरुवातीपासूनच राज ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांनी सवालांच्या तोफा डागल्या.
advertisement
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महापालिकांच्या पॅनल निवडणुकीत व्हीव्हीपॅट लावण्यात येणार नसल्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर विरोधकांनी नाराजी व्यक्त केली. या मतदानात व्हिव्हिपॅट मशीन लावण्याची मागणी राज ठाकरे यांनी केली. मतदान कोणाला जातंय हे मतदारालादेखील कळत नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. देशात आता कुठेच निवडणुका नाहीत तर VVPAT आणा अशी आग्रही भूमिका राज ठाकरे यांनी मांडली. राज्य निवडणूक आयोगाच्या प्रमुखांना बोलवा, सविस्तर चर्चा होईल, असे राज यांनी म्हटले. राज यांच्या मागणीनंतर मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी निवडणूक आयुक्तांसोबत बैठक घेण्याची मागणी मान्य केली. त्यामुळे उद्या आता महाविकास आघाडीच्या नेत्यांसह निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांच्यासोबत बैठक पार पडणार आहे. ही बैठक मंगळवारी सकाळी 11 वाजता होणार आहे.
advertisement

आव्हाडही आक्रमक

विधानसभा निवडणुकी आधी 18 रोजी नोव्हेंबर आम्ही पत्र दिले आयोगाला, खोटे मतदार नोंदणी झाल्या. त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. आज एक आमदार सांगतो की आम्ही बाहेरून मतदार आणले. अजून काय पुरावा हवाय तुम्हाला, असा सवाल शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला.
advertisement

घर अस्तित्वात नाही, पण मतदार आहेत...

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी म्हटले की, आमच्या पक्षाकडून दिल्लीला आणि महाराष्ट्र आयोगाला पत्र दिले होते. आयोग म्हणतं की पत्रच आले नाही. आमच्याकडे पुरावे आहेत. अनेक घरं अशी आहे जी अस्तित्वात नाही, पण तिथे मतदार असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले. एखादं सॉफ्टवेअर वापरुन दुबार मतदार मतदार यादीतून बाहेर काढा, अशी मागणी देखील त्यांनी केली. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी म्हटले की, आमच्या पक्षाकडून दिल्लीला आणि महाराष्ट्र आयोगाला पत्र दिले होते. आयोग म्हणतं की पत्रच आले नाही. आमच्याकडे पुरावे आहेत. अनेक घरं अशी आहे जी अस्तित्वात नाही, पण तिथे मतदार असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले. एखादं सॉफ्टवेअर वापरुन दुबार मतदार मतदार यादीतून बाहेर काढा, अशी मागणी देखील त्यांनी केली.
advertisement

शिष्टमंडळात कोण?

मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्या भेटीसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. अजित नवले, ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब, शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील, राष्ट्रवादी पवार गटाचे शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, समाजवादी पक्षाचे नेते रईस शेख, भाकपचे कॉ. प्रकाश रेड्डी उपस्थित होते.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Raj Thackeray Uddhav Thackeray : निवडणूक अधिकाऱ्यांकडे सर्वपक्षीय शिष्टमंडळ, पण धारेवर धरलं ठाकरे बंधूंनी, बैठकीत काय घडलं?
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement