Ranveer Singh Fitness : रणवीर सिंह बालपणी होता गोलुमोलू; फिटनेससाठी केलं तरी काय? जाणून घ्या 'हे' सहा सीक्रेट

Last Updated:

Ranveer Singh : फिटनेसफ्रीक रणवीर सिंहने मेहनतीच्या जोरावर आपली बॉडी बनवली आहे.

News18
News18
Ranveer Singh : रणवीर सिंहने बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. चॉकलेट फॉडी ते सिक्स पॅकपर्यंतचा प्रवास रणवीरने मेहनतीच्या जोरावर केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, रणवीर सिंह अनेक दिवसांपासून लॉयड स्टीवंसकडे पर्सनल ट्रेनिंग घेत आहे.
रणवीरच्या Fitness आणि डाएट प्लॅनचे सहा सीक्रेट
advertisement
रणवीरच्या मते उत्तम बॉडी आणि फिटनेससाठी शरिराची योग्य काळजी घेणं, आदर करणं गरजेचं आहे. आपल्या डाएटमध्ये क्लीन प्रोटीन असण्यावर रणवीर भर देतो. नियमित मासे खाण्यावर रणवीर भर देतो. रणवीर प्रामुख्याने टर्की माश्यांचा आपल्या आहारात समावेश करतो. रणवीरच्या आहारात प्रामुख्याने भेंडी, अंडी आणि स्वीट पोटॅटोचा समावेश असतो. व्यायामानंतर रणवीर सिंह प्रोटीन शेक पितो. कार्डिओ करण्यासह रणवीर पुशअप्स आणि वेटलिफ्टिंगदेखील करतो. दररोज जिममध्ये 1-2 तास घालवायला रणवीरला आवडतं.
advertisement
रणवीर सिंहच्या मते, आपलं शरीर खूप महत्त्वपूर्ण आहे. आपल्याला आपल्या शरीराचा सन्मान करायला हवा. शरीराला मंदिर मानलं पाहिजे. अभिनेता असल्यामुळे माझं दुकान माझ्या शरीरावर अवलंबून आहे. त्यामुळे जर मी शरीराची काळजी घेतली नाही तर सर्वकाही व्यर्थ आहे. गोष्टी येतील जातील, नाती मिळतील दूर जातील पण तुमचं शरीर, तुमची तब्येत कायम तुमच्यासोबत असणार आहे. मसालेदार पदार्थांचा आहार करणं टाळावा. व्यायाम केल्यानंतर एक वेगळाच उत्साह येत असतो".
advertisement
रणवीर सिंह डाएट प्लॅन काय?
रणवीर आहाराची काळजी घेतो. जंक आणि फास्ट फूड्सपासून तो दूर राहतो. रणवीर नाश्त्यामध्ये उकडलेलं अंड, फळ आणि ओट्स खायला पसंत करतो. तर दुपारच्या जेवणात डाळ-भात, हिरव्या भाज्या आणि भाकरी खातो. महत्त्वाचे म्हणजे रणवीर सिंह गोड पदार्थांपासून चार हात दूर आहे.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Ranveer Singh Fitness : रणवीर सिंह बालपणी होता गोलुमोलू; फिटनेससाठी केलं तरी काय? जाणून घ्या 'हे' सहा सीक्रेट
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement