'आपके प्यार बिना मेरी कमर नही हिलती', एव्हरग्रीन रेखाचा VIDEO व्हायरल, नक्की कोणाबद्दल बोलतेय

Last Updated:

Rekha Mesmerizes Fans Video : रेखा यांचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. हा व्हिडीओ एका जुन्या कार्यक्रमातील आहे. रेखानं या कार्यक्रमात बोलताना केलेलं स्टेटमेन्ट चर्चेत आलं आहे.

News18
News18
बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा नेहमीच त्यांचा अभिनयासाठी आणि त्याचबरोबर अदाकारी, ग्रेसफुल डान्ससाठी आणि प्रेमळ बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. वय ओलांडलं, काळ बदलला, पण रेखा यांच्याकडे पाहिल्यानंतर नेहमी असंच वाटतं की 'एज इज जस्ट अ नंबर'. अभिनेत्री रेखा जिथे उभ्या राहतात तिथे स्टारडम आपोआप निर्माण होतं असं म्हणतात. रेखा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात रेखा यांनी रेखाने नेहमीप्रमाणेच आपल्या अदा आणि बोलण्यानं प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. पण त्यात त्या एक वाक्य असं काही म्हणाल्यात जे पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.
रेखा यांचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. हा व्हिडीओ एका जुन्या कार्यक्रमातील आहे. कार्यक्रमात उपस्थित चाहत्यांनी रेखाला पाहताच टाळ्यांचा कडकडाट केला. रेखा स्टेजवर आल्या आणि वातावरण पूर्णपणे बदलून गेलं.
रेखा यांनी माइक हातात घेतला. त्या म्हणाल्या, "मित्रांनो मी असं ऐकलं आहे की देवाच्या इच्छेशिवाय झाडाचं एक पानही हलत नाही. त्याचप्रमाणे मी असं म्हणते की, तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाशिवाय माझी कंबर हलत नाही. चलिये कुछ कमर हिलाना हो जाये..." असं म्हणत रेखा स्टेजवर नाचायला सुरुवात करते. परदेसीया या गाण्याच्या म्युझिकवर रेखा नाचतात.
advertisement
रेखा पुढे म्हणतात, "तुम्हाला तर माहिती आहे की तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता. तुम्हाला माहितीये मी तुम्हाला किती आवडते. पण एक गोष्ट तुम्हाला माहिती नाहीये ती म्हणजे तुम्हा सगळ्यांनी मी जितके आवडते, तुमच्या माझ्यावर जितकं प्रेम आहे त्यापेक्षा हजारो, करोडोंहून जास्त मला तुम्ही आवडता. त्यामुळे माझी देवाकडे हिच प्रार्थना आहे की तुम्ही माझ्यावर असंच प्रेम करत राहावं आणि मी तुमच्यासमोर असंच येत राहून तुम्ही सगळ्यांचं असंच मनोरंजन करत राहीन"
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by Lehren (@lehrentv)



advertisement
अभिनेत्री रेखा यांचा व्हायरल होणारा हा व्हिडीओ Lehrentv या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये रेखा यांनी पंजाबी लूक केला आहे. रेखाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. रेखा यांना एव्हरग्रीन अभिनेत्री का म्हणतात याचं उत्तम उदाहरण देणारा हा एक व्हिडीओ आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
'आपके प्यार बिना मेरी कमर नही हिलती', एव्हरग्रीन रेखाचा VIDEO व्हायरल, नक्की कोणाबद्दल बोलतेय
Next Article
advertisement
Maharashtra Local Body Election: जिल्हा परिषद निवडणुका लांबणार? मग महापालिका निवडणूक कधी? निवडणूक आयोगाकडून मोठी अपडेट समोर
ZP निवडणुका लांबणार? मग महापालिका निवडणूक कधी? ECकडून मोठी अपडेट
  • ZP निवडणुका लांबणार? मग महापालिका निवडणूक कधी? ECकडून मोठी अपडेट

  • ZP निवडणुका लांबणार? मग महापालिका निवडणूक कधी? ECकडून मोठी अपडेट

  • ZP निवडणुका लांबणार? मग महापालिका निवडणूक कधी? ECकडून मोठी अपडेट

View All
advertisement