advertisement

व्हिएतनामच्या किनाऱ्यावर सचिन पिळगांवकरांनी गायलं 50 वर्ष जुनं गाणं; लेकीने शेअर केला फॅमिली ट्रिपमधला सर्वात क्यूट VIDEO

Last Updated:

Sachin Pilgaonkar: मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील एव्हरग्रीन अभिनेते सचिन पिळगांवकर सध्या आपल्या कुटुंबासोबत व्हिएतनामच्या निसर्गरम्य सहलीचा आनंद घेत आहेत.

News18
News18
मुंबई : काही गाणी वेळेच्या पलीकडे असतात, आणि जेव्हा ती गाणी खुद्द त्या सुपरस्टारच्या तोंडून ऐकायला मिळतात, तेव्हा तो क्षण सोन्यासारखा होतो. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील एव्हरग्रीन अभिनेते सचिन पिळगांवकर सध्या आपल्या कुटुंबासोबत व्हिएतनामच्या निसर्गरम्य सहलीचा आनंद घेत आहेत. या सहलीदरम्यानचा एक अत्यंत सुंदर व्हिडिओ त्यांची मुलगी आणि अभिनेत्री श्रिया पिळगांवकर हिने सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो पाहून चाहते पुन्हा जुन्या आठवणीत रमले आहेत.

व्हिएतनामचा किनारा अन् १९७५ ची ती आठवण

श्रियाने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये, सचिन पिळगांवकर व्हिएतनामच्या एका सुंदर बॅकवॉटरच्या कडेला निवांत बसलेले दिसत आहेत. डोक्यावर कॅप आणि अंगात जॅकेट अशा कॅज्युअल लूकमध्ये निसर्गाचा आनंद घेत असतानाच, अचानक सचिनजींनी आपल्या आवाजात गाणं गुणगुणायला सुरुवात केली. ते गाणं होतं, "गीत गाता चल, गुनगुनाता चल..."
advertisement
१९७५ मध्ये प्रदर्शित झालेल्या त्यांच्या गाजलेल्या 'गीत गाता चल' या हिंदी चित्रपटातील हे शीर्षक गीत आहे. कित्येक दशकांनंतरही सचिनजींच्या आवाजात तोच गोडवा आणि तोच निरागसपणा अनुभवताना श्रियालाही आपला मोह आवरता आला नाही.

श्रियाने आईवडिलांसाठी प्लॅन केली ट्रिप

advertisement
आपल्या आई-वडिलांसोबतच्या या प्रवासाबद्दल श्रियाने खूप सुंदर लिहिलं आहे. ती म्हणते, "माझ्या वडिलांसोबत प्रवास करताना मला सर्वात जास्त काय आवडत असेल, तर एखाद्या ठिकाणचं सौंदर्य ते गाण्यांतून कसं व्यक्त करतात हे पाहणं."
advertisement
सचिन आणि सुप्रिया पिळगांवकर यांच्या लग्नाला नुकतीच ४० वर्षे पूर्ण झाली आहेत. याच निमित्ताने श्रियाने या पॉवर कपलसाठी व्हिएतनामची ही खास ट्रिप प्लॅन केली होती. या ट्रिपमध्ये श्रियाने स्वतः टूर गाईडची भूमिका चोख बजावली.

सायकलिंग, डान्स अन् सुप्रियाजींचा स्वॅग

या सहलीचे अनेक मजेतले व्हिडिओ श्रियाने पोस्ट केले आहेत. एका व्हिडिओमध्ये सचिनजी स्वतः कॅमेरा धरून सुप्रियाजींचं शूटिंग करत आहेत, तर सुप्रियाजी एखाद्या अभिनेत्रीसारख्या दिमाखात त्यांच्याकडे चालत येत आहेत. बोटीतून फिरणं असो, व्हिएतनामच्या गल्ल्यांमधून सायकल चालवणं असो किंवा रस्त्यावर मनसोक्त डान्स करणं... पिळगांवकर फॅमिलीच्या या हॅपी मुमेंट्सने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
व्हिएतनामच्या किनाऱ्यावर सचिन पिळगांवकरांनी गायलं 50 वर्ष जुनं गाणं; लेकीने शेअर केला फॅमिली ट्रिपमधला सर्वात क्यूट VIDEO
Next Article
advertisement
Iran War Cost: 71,71,47,40,000  प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार, महत्त्वाच्या गोष्टीचा 'लिमिटेड' साठा
71,71,47,40,000 प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार
  • युद्धाची किंमत कल्पनेपलीकडे!

  • इराणमध्ये अमेरिका अडकली डेथ ट्रॅपमध्ये

  • एका दिवसात 6,500 कोटी खाक

View All
advertisement