Salman Khan : पाकिस्तानचे तुकडे, सौदी अरेबियात सलमान भारतीयांच्या मनातलं बोलला; आमीर-शाहरुख बघतच राहिले

Last Updated:

Salman Khan Controversy : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान सध्या त्याच्या एका वक्तव्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. त्याच्या एका वक्तव्यामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा आणि वाद निर्माण झाला आहे.

News18
News18
मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान सध्या त्याच्या एका वक्तव्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. सौदी अरेबियातील 'जॉय फोरम २०२५' मध्ये बोलताना सलमानने मध्य-पूर्वेत काम करणाऱ्या परदेशी समुदायांचा उल्लेख करताना 'बलुचिस्तान' आणि 'पाकिस्तान' या देशांचा उल्लेख वेगवेगळा केला. सलमानच्या या शा‍ब्दिक चुकीमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा आणि वाद निर्माण झाला आहे.

नेमकं काय म्हणाला सलमान खान?

सलमान खान, शाहरूख खान आणि आमिर खानसोबत या कार्यक्रमाला उपस्थित होता. तिथे तो भारतीय सिनेमाची वाढती जागतिक लोकप्रियता आणि मध्य-पूर्वेतील दक्षिण आशियाई समुदायाबद्दल बोलत होता.
व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये सलमान म्हणाला, "सध्या जर तुम्ही हिंदी चित्रपट बनवून इथे सौदी अरेबियात प्रदर्शित केला, तर तो सुपरहीट होईल. तुम्ही तमिळ, तेलुगू किंवा मल्याळी चित्रपट बनवला, तरी तो शेकडो कोटींचा व्यवसाय करेल, कारण इथं इतर देशांतून अनेक लोक आले आहेत. इथे बलुचिस्तानचे लोक आहेत, अफगाणिस्तानचे लोक आहेत, पाकिस्तानचे लोक आहेत... सगळे इथे काम करत आहेत."
advertisement
advertisement

राजकीय भूकंपाची चर्चा

सलमान खानने बलुचिस्तानचा उल्लेख पाकिस्तानपासून स्वतंत्र असा केल्याने इंटरनेटवर लगेचच वादळ उठले. बलुचिस्तान हा पाकिस्तानचा सर्वांत मोठा प्रांत असला तरी, तिथे १९४८ पासूनच स्वतंत्रता आंदोलन सुरू आहे. बलुच लोक स्वतःला पाकिस्तानमधील पंजाबी किंवा सिंधी समुदायापेक्षा वेगळे मानतात.
पत्रकार स्मिता प्रकाश यांनी ही क्लिप 'X' वर शेअर करत लिहिले, "मला माहीत नाही ही स्लिप ऑफ टंग होती की जाणूनबुजून म्हटले आहे, पण हे आश्चर्यकारक आहे! सलमान खानने 'बलुचिस्तानचे लोक' आणि 'पाकिस्तानचे लोक' असा वेगळा उल्लेख केला." दुसऱ्या एका युजरने लिहिले, "सलमान खानकडून ही स्लिप ऑफ टंग होती की बलुचिस्तान स्वतंत्र असल्याचे तो जाणीवपूर्वक सांगत होता? विशेष म्हणजे, बाजूला आमिर खान आणि शाहरुख खानही होते."
advertisement
अनेक युजर्सनी सलमान खानचे समर्थनही केले आहे. त्यांनी म्हटले की, सलमानचा हा उल्लेख प्रादेशिक ओळखीबद्दल त्याचे असलेले ज्ञान दर्शवतो. एका युजरने लिहिले, "जेव्हा @BeingSalmanKhan 'बलुचिस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तान...' म्हणाला, तेव्हा ते खूप काही सांगून गेले. बलुचिस्तान हा पाकिस्तानी प्रांत नसून एक राष्ट्र आहे."
advertisement
मात्र, अनेक युजर्सनी जास्त विश्लेषण न करण्याचा सल्ला दिला. एका युजरने म्हटले, "बॉलिवूड कलाकारांकडून भू-राजकीय अचूकतेची अपेक्षा करू नये." तथापि, या वादावर सलमान खान किंवा त्याच्या टीमकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Salman Khan : पाकिस्तानचे तुकडे, सौदी अरेबियात सलमान भारतीयांच्या मनातलं बोलला; आमीर-शाहरुख बघतच राहिले
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement