हिंदू मुलाशी संसार थाटल्याने सारा ट्रोल, लक्ष्मणाच्या मुस्लीम सुनेनं दिलं सडेतोड उत्तर; म्हणाली," कोणताच धर्म..."
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Sara Khan Troll : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री सारा खान कृष पाठकसोबत लग्न केल्याने ट्रोल झाली असून आता व्हिडीओ शेअर करत तिने सडेतोड उत्तर दिलं आहे.
Sara Khan : प्रसिद्ध अभिनेत्री सारा खान दोन दिवसांपूर्वीच 'रामायण'मधील लक्ष्मणाच्या मुलासोबत म्हणजेच कृष पाठकसोबत लग्नबंधनात अडकली. सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्यांनी चाहत्यांना लग्नाबाबत माहिती दिली. या आंतरधर्मीय विवाहमुळे साराला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला. आता याबाबत व्हिडीओ शेअर करत साराने आपली प्रतिक्रिया दिली आहे. या व्हिडीओमध्ये सारा लग्नबाबत शुभेच्छा देणाऱ्या चाहत्यांचे आभार मानताना दिसत आहे. तसेच आपला आंतरधर्मीय विवाह आणि पालकांनी वेगवेगळ्या धर्मांचा आदर करायला शिकवल्याचंही सांगते. दरम्यान ट्रोलर्सला प्रेम करण्याचा सल्लाही देते. साराचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
काय म्हणाली सारा खान?
सारा व्हिडीओमध्ये म्हणतेय,"कृष्ण आणि मी वेगवेगळ्या संस्कृतीतले आहोत. आमच्या दोन्ही धर्मांनी आम्हाला प्रेम करायला शिकवलं आहे. आमच्या कुटुंबियांनी सर्वात आधी आम्हाला दुसऱ्याचा सन्मान, आदर करायला शिकवलं आहे. कोणाचं मन दुखावलं जाणार नाही याची काळजी घ्यायला सांगितलं आहे. सकारात्मक विचार करणाऱ्या आमच्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांचे मला आभार मानायचे आहेत".
advertisement
कोणताच धर्म दुसऱ्या धर्माचा अनादर करा शिकवत नाही : सारा खान
सारा पुढे म्हणतेय,"कोणताच धर्म तुम्हाला कोणत्या दुसऱ्या धर्माचा अनादर करा, असं शिकवत नाही याची नोंद घ्या. आमच्या शुभचिंतकांसाठी आम्ही लग्न केल्याचं जाहीर केलं. लग्नासाठी आम्हाला कोणाची परवानगी नको होती. कारण आम्हाला आमच्या कुटुंबाचा आधीपासूनच पाठिंबा होता. माझं माझ्यादेवासोबत काय नातं आहे हे मला माहिती आहे. याबद्दल बोलण्याचा, टीका करण्याचा कोणाला अधिकार नाही. कोणताच धर्म तुम्हाला चुकीच्या पद्धतीने इतरांच्या आयुष्यात हस्तक्षेप करा असं सांगत नाही.
advertisement
सारा खानने या व्हिडीओमध्ये असेही म्हटले आहे की ती कृषसोबत दुसऱ्या धर्माचा सन्मान करत निकाह आणि पारंपारिक पद्धतीने सात फेरे घेत लग्न करेल. विशेष म्हणजे साराने या पोस्टसोबत 'रब ने बना दी जोडी' हे गाणं वापरलं आहे. सारा खान आणि कृष पाठक यांनी 8 ऑक्टोबर 2025 रोजी कुटुंबिय आणि जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत कोर्ट मॅरेज केलं होतं.
advertisement
डिसेंबरमध्ये घेणार सात फेरे
view commentsसाराने व्हिडीओच्या शेवटी डिसेंबरमध्ये निकाह आणि सात फेरे घेणार असल्याचं सांगितलं आहे. व्हिडीओ शेअर करत साराने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे,"सर्वांचे आभार आणि ,तुम्हा सर्वांना प्रेम, प्रेम आणि फक्त प्रेम". चाहत्यांना आता सारा आणि कृषच्या लग्नाची प्रतीक्षा आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 11, 2025 6:01 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
हिंदू मुलाशी संसार थाटल्याने सारा ट्रोल, लक्ष्मणाच्या मुस्लीम सुनेनं दिलं सडेतोड उत्तर; म्हणाली," कोणताच धर्म..."