नोकराला मारून घरातच पुरलं, त्याच्याच कबरीवर केली मिरचीची शेती; 17 मिनिटांची सस्पेन्स थ्रिलर पाहून झोप उडेल
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Best Suspense Thriller Short Film: ९ वर्षांपूर्वी रिलीज झालेली ही अवघ्या १७ मिनिटांची शॉर्ट फिल्म कोणत्याही मोठ्या हॉरर सिनेमापेक्षा जास्त भयानक आहे.
सस्पेन्स आणि थ्रिलर प्रेमींसाठी यूट्यूबवर एक असा खजिना उपलब्ध आहे, जो पाहिल्यानंतर तुम्ही चटणी खाण्याआधी हजार वेळा विचार कराल. ९ वर्षांपूर्वी रिलीज झालेली ही अवघ्या १७ मिनिटांची शॉर्ट फिल्म कोणत्याही मोठ्या हॉरर सिनेमापेक्षा जास्त भयानक आहे. या चित्रपटाचं नाव आहे 'चटणी' (Chutney).

गोष्ट सुरू होते एका हाय-प्रोफाईल पार्टीतून. तिथे वनिता (टिस्का चोप्रा) नावाच्या एका साध्या, कोणाचंही लक्ष वेधून न घेणाऱ्या महिलेबद्दल काही बायका कुजबुज करत असतात.
advertisement

त्याच पार्टीत वनिता पाहते की, तिची मैत्रीण रसिका (रसिका दुग्गल) ही वनिताच्या पतीशी (आदिल हुसेन) जरा जास्तच जवळीक साधण्याचा प्रयत्न करतेय, त्यांच्यात उघडपणे फ्लर्टिंग सुरू असतं. वनिता हे सर्व शांतपणे पाहते, पण तिच्या मनात काय चाललंय याची कोणालाच कल्पना नसते.
advertisement

दुसऱ्या दिवशी सकाळी रसिका वनिताच्या घरी येते. वनिता तिचं हसतमुखाने स्वागत करते आणि तिला गरमागरम भजी, थंड पेय आणि एक खास हिरवी चटणी खायला देते. चटणीची चव चाखताच रसिका थक्क होते आणि तिची खूप स्तुती करते.
advertisement

नेमकी इथूनच खेळाला सुरुवात होते! वनिता अगदी शांतपणे रसिकाला तिच्या एका जुन्या नोकराची, भोलाची गोष्ट सांगायला लागते. ती सांगते की, भोलाने जेव्हा वनिताच्या दीराला आणि स्वतःच्या पत्नीला रंगेहात पकडलं, तेव्हा त्याची कशी हत्या करण्यात आली.
advertisement

वनिता पुढे जे सांगते ते ऐकून रसिकाच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडतो. वनिता सांगते की, त्यांनी भोलाचा मृतदेह घराच्या अंगणातच दफन केला आणि त्यावर माती टाकून तिथेच कोथिंबीर, मिरच्या आणि पुदिना लावला आणि आज रसिका जी चटणी खातेय, ती त्याच मातीतील कोथिंबिरीची आहे.
advertisement

ही फिल्म केवळ एका मर्डर मिस्ट्रीवर आधारित नाही, तर ती एका स्त्रीच्या छुप्या रागाचं आणि सूडाचं अचूक दर्शन आहे. टिस्का चोप्राने ज्या पद्धतीने एका बिचाऱ्या वाटणाऱ्या गृहिणीची भूमिका साकारली आहे, ती पाहून तुमची झोप उडेल.
advertisement

आदिल हुसेन आणि रसिका दुग्गल यांनीही आपल्या अभिनयाने या कथेला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. याच कारणामुळे या शॉर्ट फिल्मला IMDb वर चक्क ८.८ रेटिंग मिळालं आहे.

'रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट शॉर्ट्स' या यूट्यूब चॅनलवर ही फिल्म मोफत उपलब्ध आहे. केवळ १७ मिनिटांत ही कथा तुम्हाला असं काही चटका लावून जाईल की, तुम्ही चटणीच्या प्रत्येक घासाकडे संशयाने पाहाल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 13, 2026 9:11 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
नोकराला मारून घरातच पुरलं, त्याच्याच कबरीवर केली मिरचीची शेती; 17 मिनिटांची सस्पेन्स थ्रिलर पाहून झोप उडेल









