'तुमचे बाप डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस अभिनय करतोय', सचिन पिळगावकरांवर ट्रोलिंग, मराठी अभिनेता संतापला

Last Updated:

Bhushan Patil Video : प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने सचिन पिळगावकर यांच्यावर होत असलेल्या ट्रोलिंगवर भाष्य केलं आहे. त्याने ट्रोलर्सना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलंय.

News18
News18
मुंबई : मराठी मनोरंजन विश्वात मागील काही महिन्यांपासून कलाकारांना ट्रोल करण्याची एकही संधी ट्रोलर्स सोडत नाहीत. छावा सिनेमाच्या वेळेस अभिनेता संतोष जुवेकरवर प्रचंड ट्रोलिंग करण्यात आलं होतं. त्याचबरोबर ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांना देखील मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातंय. सोशल मीडिया ओपन केल्यानंतर अनेक मिम्स देखील पाहायला मिळत आहेत. कलाकारांना ट्रोल करण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यावर एका प्रसिद्ध अभिनेत्याने व्हिडीओ शेअर करत ट्रोलर्सना चांगलीच चपराक दिली आहे. अभिनेत्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
'शिवरायांचा छावा', 'मनमौज', 'घे डबल', 'ओळख', 'बर्नी' सारख्या मराठी सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता भूषण पाटील यानं अभिनेते सचिन पिळगावकर यांच्यावर होत असलेल्या ट्रोलिंगवर भाष्य केलं आहे. त्याने ट्रोलर्सना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलंय.
advertisement
भूषणने त्याच्या व्हिडीओमध्ये म्हटलंय, "आजकाल एक नवीन ट्रेंड चाललाय मराठी कलाकारांना ट्रोल करण्याचा. हल्लीच सचिन पिळगांवकर सरांच्या मुलाखतींचे काही कमेंट्स किंवा त्याच्या आधी संतोष जुवेकरवर खूप ट्रोलिंग केलं गेलं. आणि आणखीन इतर कलाकार. मला माहित नाहीये हे कोण करतंय, हे जाणून बुजून केलं जातंय. पण मला ह्या ट्रोलर्सना त्यांच्याच भाषेत सांगायचंय. तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते ना तेव्हापासून हा माणूस अभिनय करतोय. त्यामुळे इतर कलाकारांना ट्रोल करण्यापेक्षा स्वतःच्या आयुष्यावर लक्ष द्या. तुमच्या भल्याचं सांगतोय."
advertisement
advertisement
"स्वतःच्या भाषेचा आणी कलाकारांचा आदर करायला शिका", असं कॅप्शन देत भूषणने हा व्हिडीओ शेअर केला आहे. भूषणने शेअर केलेल्या व्हिडीओवर आणि त्याच्या वक्तव्याचं अनेकांनी कौतुक केलं आहे. गायक अवधूत गुप्ते यानं कमेंट करत, "खूप योग्य.. खूप छान भूषण", असं लिहिलं आहे. सोबत हार्ट इमोजी देखील शेअर केलेत.
अभिनेता भूषण याचा शिवरायांचा छावा हा सिनेमा काही महिन्यांआधी रिलीज झाला होता. या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्याच्या अभिनयाचं देखील कौतुक करण्यात आलं. थिएटरमधील प्रेक्षकांचे अनेक व्हिडीओ देखील व्हायरल झाले होते.
मराठी बातम्या/मनोरंजन/
'तुमचे बाप डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस अभिनय करतोय', सचिन पिळगावकरांवर ट्रोलिंग, मराठी अभिनेता संतापला
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement