Zubeen Garg : जुबिन गर्गचा मृत्यू कसा झाला? सिंगापूरहून आलं Death Certificate, मुख्यमंत्र्यांनी दिली नवी अपडेट

Last Updated:

Zubeen Garg Death Reason : प्रसिद्ध गायक जुबिन गर्गच्या मृत्यूबाबत आता एक नवी माहिती समोर आली आहे. सिंगापूर सरकारने जुबिनचे मृत्यू प्रमाणपत्र जारी केले आहे.

News18
News18
मुंबई : ‘या अली’ या गाण्याने जगभरात ओळख मिळवलेला प्रसिद्ध गायक जुबिन गर्गचा मृत्यूने संपूर्ण देशाला हादरवलं आहे. त्याच्या निधनामुळे आसाम सरकारने 20 ते 22 सप्टेंबर या तीन दिवसांसाठी राज्य दुखवटा जाहीर केला आहे. आज 21 सप्टेंबरला त्याचे पार्थिव त्याच्या निवासस्थानी नेण्यात आले. जुबिनचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी रस्त्यावर गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. जुबिन गर्ग यांचे पार्थिव सरुसुजाई स्टेडियममध्ये ठेवले गेले, जेणेकरून आसामकरांना त्यांचे अंतिम दर्शन घेता येईल.

जुबिनच्या मृत्यूबाबत पत्नीने केला होता धक्कादायक खुलासा

19 सप्टेंबर 2025 रोजी सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग करताना त्याचा अपघाती मृत्यू झाला. सुरुवातीला असं म्हटलं जात होतं की, त्याने लाईफ जॅकेट घातलं नव्हतं. नंतर जुबिनच्या पत्नीने, गरिमा सैकियाने या सगळ्या अफवांना पूर्णविराम देत ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, जुबिन त्याच्या टीममधील सात ते आठ लोकांसोबत एका यॉटवर होता. ते सगळे लाईफ जॅकेट घालून समुद्रात पोहायला गेले होते. ते सगळे एकत्र पोहले आणि पुन्हा यॉटवर परतले. सगळ्यांनी लाईफ जॅकेट घातले होते. पण, जुबिनने पुन्हा पोहण्यासाठी पाण्यात उडी मारली आणि त्याला फिटचा अटॅक आला.”
advertisement
गरिमा यांनी सांगितलं की, जुबिनला याआधीही अनेक वेळा फिट्स आल्या होत्या. सिंगापूरमध्ये जेव्हा त्याच्या टीममधील लोकांना काहीतरी वेगळं घडत असल्याचा संशय आला, तेव्हा त्यांनी त्याला वाचवलं. त्याला तातडीने सिंगापूर जनरल हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दोन तास ठेवण्यात आलं, पण त्याला वाचवता आलं नाही.
advertisement

मुख्यमंत्र्यांनीही सांगितलं मृत्यूचं कारण

एका पत्रकार परिषदेत आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही याबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की, जुबिनचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात तो लाईफ जॅकेट घालून पाण्यात उडी मारताना दिसत आहे. एका मिनिट आणि 26 सेकंदांनी तो यॉटवर परतला, पण नंतर पुन्हा त्याने जॅकेटशिवाय पाण्यात उडी मारली.
advertisement

सिंगापूर सरकारने जारी केलं जुबिनच्या मृत्यूचं प्रमाणपत्र

अशातच आता एक नवी माहिती समोर आली आहे. सिंगापूरने जारी केलेल्या मृत्यू प्रमाणपत्रानुसार गायिका झुबीन गर्गचा बुडून मृत्यू झाला. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी याबाबत माहिती दिली आहे.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Zubeen Garg : जुबिन गर्गचा मृत्यू कसा झाला? सिंगापूरहून आलं Death Certificate, मुख्यमंत्र्यांनी दिली नवी अपडेट
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement