Soha Ali Khan : '...अन् तो प्रायव्हेट पार्ट दाखवायला लागला' दिवसाढवळ्या सोहा अली खानसोबत धक्कादायक प्रकार, नेमकं काय घडलेलं?
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Soha Ali Khan : बॉलिवूड अभिनेत्री आणि पटौदी घराण्याची लेक सोहा अली खान नेहमीच चर्चेत असते. सिनेमांमध्ये ती दिसत नसली तरी सोशल मीडियावर आणि तिच्या पॉडकास्ट चॅनेलमुळे ती प्रकाश झोतात येत असते.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि पटौदी घराण्याची लेक सोहा अली खान नेहमीच चर्चेत असते. सिनेमांमध्ये ती दिसत नसली तरी सोशल मीडियावर आणि तिच्या पॉडकास्ट चॅनेलमुळे ती प्रकाश झोतात येत असते. अलीकडेच एक धक्कादायक खुलासा केला आहे. तिने सांगितले की इटलीत तिला दिवसाढवळ्या एका अनोळखी पुरुषाने सार्वजनिक ठिकाणी त्रास दिला. या घटनेमुळे ती हादरली होती.
सोहा हॉटर्फ्लाय या माध्यमाशी संवाद साधत होती. तेव्हा तिला विचारण्यात आले की तिला कधी सार्वजनिक ठिकाणी फ्लॅश केले गेले आहे का? यावर अभिनेत्री म्हणाली, “हो, इटलीत माझ्यासोबत असं झालं होतं ते पण दिवसाढवळ्या. एक व्यक्ती प्रायव्हेट पार्ट दाखवत होता. मला कधीच कळलं नाही की यामागचा हेतू काय असतो. अशा व्यक्तींच्या मनात काय चाललंय, हे जाणून घ्यायची इच्छा देखील होत नाही."
advertisement
या अनुभवाबद्दल बोलताना सोहा म्हणाली की ती स्वतःला भाग्यवान समजते. कारण बऱ्याचदा महिलांना अशा गोष्टींना रोज सामोरे जावे लागते आणि त्यांच्याकडे कोणताही आधार नसतो.
यावेळी सोहाला विचारण्यात आले की बॉलिवूडमध्ये काम करताना तिला कास्टिंग काउचचा अनुभव आला का? अभिनेत्री म्हणाली, “नाही. माझ्या बाबतीत कदाचित माझ्या पार्श्वभूमीमुळे हे टळलं. लोकांना माहिती होतं की मी सैफ अली खानची बहीण आहे, शर्मिला टागोर माझी आई आहे. त्यामुळे कोणी माझ्याकडे तसं वागलं नाही. यासाठी देवाचे आभार मानते.”
advertisement
सोहा अली खानने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘रंग दे बसंती’, ‘खोया खोया चाँद’, ‘तुम मिले’ यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने अभिनय केला आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत ती अभिनयापासून दूर होती. 2018 मध्ये ती शेवटची ‘साहेब बीवी और गँगस्टर 3’ मध्ये दिसली होती. सात वर्षांच्या ब्रेकनंतर ती पुन्हा ‘छोरी 2’ या हॉरर-थ्रिलर चित्रपटातून परतली. या चित्रपटात तिच्यासोबत नुसरत भरुच्चा, गश्मीर महाजनी आणि जितेंद्र कुमार प्रमुख भूमिकेत होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 15, 2025 11:29 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Soha Ali Khan : '...अन् तो प्रायव्हेट पार्ट दाखवायला लागला' दिवसाढवळ्या सोहा अली खानसोबत धक्कादायक प्रकार, नेमकं काय घडलेलं?