सचिन पिळगांवकरांच्या सुपरहिट सिनेमाची मराठी मालिकेत कॉपी, VIDEO व्हायरल
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Marathi serial copied Sachin Pilgaonkar Film : स्टार प्रवाहची नवी मालिका सचिन पिळगांवकरांच्या सिनेमाची कॉपी आहे. मालिकेचा पहिला प्रोमो चांगलाच व्हायरल होतोय.
मराठी टेलिव्हिजनवर मागच्या काही महिन्यात अनेक नव्या मालिका सुरू झाल्या आहेत. अनेक मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. नव्या मालिका हळू हळू प्रेक्षकांना आवडू लागल्या आहेत. अशातच आणखी एका नव्या मालिकेची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे.
ही मालिका स्टार प्रवाहवर सुरू होणार असून मालिकेचा पहिला AI प्रोमो समोर आला आहे. मालिकेचा पहिला प्रोमो पाहूनच मालिकेची कथा प्रेक्षकांच्या लक्षात आली आहे. ही नवी मालिका अभिनेते सचिन पिळगांवकर यांच्या सिनेमाची कॉपी असल्याचं प्रेक्षकांनी म्हटलं आहे.
मालिकेच्या प्रोमोमध्ये हिरो हिरोईन लग्न करून घरी येतात. नवरी तिच्या गृहप्रवेशासाठी उत्सुक असते. हिरो तिला म्हणतो, आमचं घर सुंदर आहे आणि मायेनं भरलेलं आहे. आमच्यासाठी आमचं घर घर नाही तर मंदिर आहे. असं म्हणताच घराचं दार उघडतं आणि मंदिर नाही तर हे घर कुंबाड खाना असल्याचं चित्र दिसतं. हिरो आमच्या चारही भावांच्या म्हणजे आपल्या घरात तुझं स्वागत आहे. हिरोईन घरात पाऊल ठेवताच, हॉलमध्ये कपडे अस्ताव्यस्थ पडलेले असतात. किचनमध्ये भांड्यांचा पसारा असतो. कपडे हँगरला नाही पंख्याला पटलेले असतात.
advertisement
हा सगळा प्रकार पाहून नवी नवरी हातातला हात खाली टाकते आणि पदर खोसून कामाला लागते. घराला घरपण बाईमुळेच येतं अशी टॅगलाइन घेऊन ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा प्रोमो पाहून ही मालिका सचिन पिळगांवकर यांच्या आम्ही सातपुते या सिनेमाचा रिमेक असल्याचं दिसतंय. प्रेक्षकांनीही तशाच कमेंट केल्या आहेत. आम्ही सातपुते हा सिनेमा 2008 साली आला होता. सचिन पिळगांवकर सिनेमाचे निर्माते, दिग्दर्शक होते. सहा भाव आणि त्यांची वहिनी, भावांना सुधरवण्याचं कॉन्ट्रॅक्ट घेतलेल्या वहिनीची स्टोरी सिनेमा दाखवण्यात आली होती. हा सिनेमा 1982 साली आलेल्या रमेश सिप्पी यांच्या सत्ते पे सत्ता या सिनेमाचा मराठी रिमेक होता.
advertisement
advertisement
जवळपास 18 वर्षांनी सचिन पिळगांवकर यांच्या आम्ही सातपुते या सिनेमाचा मालिकेत रिमेक पाहायला मिळणार आहे. आता मालिकेत प्रमुख भूमिकेत कोणते कलाकार आहेत हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. अभिनेत्री ईशा केसकर मालिकेत दिसण्याची शक्यता प्रेक्षकांनी वर्तवली आहे.
बाई तुझा आशीर्वाद ही मालिका कधी आणि किती वाजता सुरू होणार? ही मालिका सुरू होणार म्हणजे कोणती मालिका संपणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 19, 2026 3:30 PM IST








