Ajay Purkar : 'सुभेदार' पाहताच ढसाढसा रडली अजय पुरकरांची लेक; बाप लेकीचा सुंदर व्हिडीओ पाहून व्हाल भावुक
- Published by:Nishigandha Kshirsagar
Last Updated:
काल या चित्रपटाचा खास प्रीमियर आयोजित करण्यात आला होता. यावेळी कलाकारांनी तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी चित्रपट पाहायला हजेरी लावली होती. आता याच प्रीमियर मधील एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे.
मुंबई, 25 ऑगस्ट : मराठी बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक चित्रपट गाजवणारा दिग्दर्शक म्हणजे दिगपाल लांजेकर. त्यांच्या शिवराज अष्टकातील पाचवा चित्रपट सुभेदार काल २५ ऑगस्ट रोजी रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाआधीच अनेक विक्रम मोडले. मराठीतील सर्वात वेगवान पहिला जाणारा ट्रेलर सुभेदाराचा होता. त्याचसोबत प्रदर्शनाआधीच या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. काल या चित्रपटाचा खास प्रीमियर आयोजित करण्यात आला होता. यावेळी कलाकारांनी तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी चित्रपट पाहायला हजेरी लावली होती. आता याच प्रीमियर मधील एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे.
दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर ‘शिवराज अष्टकाची निंर्मिती करत आहेत. त्याअंतर्गत आजवर फर्जंद, फत्तेहशिकस्त, पावनखिंड आणि शेर शिवराज हे चित्रपट प्रदर्शित झाले. या चित्रपटांना भरभरून यश मिळालं. ‘पावनखिंडने तर कमाईचे अनेक विक्रम मोडले. याच अष्टकातील पाचवा चित्रपट सुभेदार आता प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यातीलच 'सुभेदार' हा पाचवा चित्रपट आहे. सुभेदार हा चित्रपट नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या सिंहगडावरील पराक्रमावर आधारित आहे. या चित्रपटात तान्हाजी मालुसरेंच्या भूमिकेत अजय पुरकर झळकले आहेत.
advertisement
Subhedar ला प्रेक्षकांचा दणकून प्रतिसाद; पण समीक्षकांना कसा वाटला चित्रपट? इथं वाचा रिव्ह्यू
अजय पुरकर यांनी याआधी पावनखिंड मध्ये बाजीप्रभू देशपांडेंची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका, त्यांचे दमदार डायलॉग प्रेक्षकांच्या आजही आहेत. आता बाजीप्रभू देशपांडेंची भूमिका गाजवल्यानंतर अजय पुरकर सुभेदार मध्ये तान्हाजी मालुसरेंच्या भूमिकेत झळकले आहेत. त्यांच्या या चित्रपटातील अभिनयावर चाहते तर फिदा झाले आहेत. आता हा चित्रपट पाहताच अजय पुरकरांच्या लेकीला अश्रू अनावर झाले. 'इट्स मज्जा' या इंस्टाग्राम पेजने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
advertisement
या चित्रपटाच्या प्रीमियरला अजय पुरकर यांच्या कुटुंबीयांनी हजेरी लावली होती. त्यांनी कुटुंबासहित हा चित्रपट पहिला. हा चित्रपट संपताच उपस्थित प्रेक्षकांनी आणि कलाकारांनी एकच जल्लोष केला. पण अजय पुरकरांची मुलगी मात्र बाबांचा अभिनय पाहून ढसाढसा रडत होती. त्याचा व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. लेकीच्या डोळ्यातलं पाणी पाहून अजय पुरकरांना त्यांच्या अभिनयाची पावती मिळाली असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
advertisement
advertisement
सुभेदार तान्हाजी मालुसरे यांचे कल्याणकारी जीवनकार्य तसेच स्वराज्यासाठीच्या बलिदानाची तेजस्वी यशोगाथा मांडणाऱ्या दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘सुभेदार’ चित्रपटाद्वारे आपल्याला पुन्हा एकदा इतिहासाचे साक्षीदार होण्याची संधी मिळाली आहे. सुभेदार या सिनेमात मागील सिनेमांप्रमाणेच अभिनेता चिन्मय मांडलेकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भुमिकेत आहे. तर अभिनेत्री मृणाल कुलकर्णी जिजाबाईंच्या भुमिकेत पाहायला मिळणार आहे. तर अभिनेते अजय पुरकर सुभेदार तान्हाजी मालुसरेंच्या प्रमुख भुमिकेत आहेत. त्याचप्रमाणे अभिनेत्री स्मिता शेवाळे, अभिजीत श्वेतचंद्र, मृण्मयी देशपांडे सारखे कलाकार आहेत. आता या चित्रपटाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात ते पाहणं महत्वाचं आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 26, 2023 11:54 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Ajay Purkar : 'सुभेदार' पाहताच ढसाढसा रडली अजय पुरकरांची लेक; बाप लेकीचा सुंदर व्हिडीओ पाहून व्हाल भावुक