Diwali 2025 : पुणेकरांनो दिवाळीला फटाके वाजवताय? आधी ही पोलिसांची नियमावली वाचा, नाहीतर होईल कारवाई
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होते. हे वायू प्रदूषण टाळण्यासाठी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी नियमावली जाहीर केली आहे.
पुणे : दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होते. हे वायू प्रदूषण टाळण्यासाठी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत फटाके वाजवण्यास बंदी घालण्यात आली आहे. पोलिसांच्या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
रात्री 10 ते सकाळी 6 फटाके वाजवण्यास मनाई
फटाके वाजवण्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने आधीच नियमावली निश्चित केली आहे. ध्वनी आणि वायू प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी या नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत फटाके वाजवण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
advertisement
पोलिसांच्या आदेशानुसार मोठा आवाज करणारे ॲटमबॉम्ब वाजवणे, बाळगणे किंवा विक्री करणे पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. तसेच, शहरातील रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि न्यायालयांच्या 100 मीटर परिसरातील भाग शांतता क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. या क्षेत्रांमध्ये दिवसा आणि रात्री दोन्ही वेळा फटाके वाजवण्यास बंदी घालण्यात आली आहे, असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी आदेशात नमूद केले आहे.
advertisement
पुणे शहरात 20 ते 24 ऑक्टोबर दरम्यान तात्पुरत्या परवानगीवर फटाक्यांची विक्री करता येणार आहे. पण महामार्गावर, पुलावर किंवा सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवणे आणि अग्निबाण (रॉकेट) उडवणे पूर्णपणे बंद आहे. फटाक्यांचा आवाज 125 डेसिबलपेक्षा जास्त नसावा, असा नियम करण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई होणार असल्याचा इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
October 09, 2025 5:12 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Diwali 2025 : पुणेकरांनो दिवाळीला फटाके वाजवताय? आधी ही पोलिसांची नियमावली वाचा, नाहीतर होईल कारवाई