घर झालं, मुहूर्त ठरला आता सनई चौघडे वाजणार, सूरज चव्हाणची लग्न पत्रिका समोर, तुम्हाला आली का?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Suraj Chavan Wedding Card : सूरज चव्हाणचं लग्न 29 नोव्हेंबर रोजी असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता सूरज चव्हाणची लग्नाची थेट पत्रिकाच समोर आली आहे.
रील स्टार आणि बिग बॉस फेम अभिनेता सूरज चव्हाणचं लग्न काही दिवसांवर आलं आहे. त्याआधी त्याने त्याच्या नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. एकीकडे नव्या घराचं बांधकाम आणि दुसरीकडे सूरज चव्हाणची लगीन घाई सुरू होती. अखेर घर बनून तयार झालं असून दुसरीकडे सूरज चव्हाणच्या लग्नाची जोरात सुरू झाली आहे. घर झालं, मुहूर्त देखील ठरला आहे आता सनई चौघडे वाजणार आहेत. सूरज चव्हाणच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
सूरज चव्हाणने काही दिवसांआधी त्याच्या होणाऱ्या बायकोचा चेहरा सर्वांना दाखवला. संजना असं सूरज चव्हाणच्या होणाऱ्या बायकोचं नाव आहे. संजना ही सूरज चव्हाणच्या चुलत मामाची मुलगी आहे. सूरज आणि संजना एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. संजना ही अत्यंत साधी आणि सूरजला हवी होती तशीच आहे.
advertisement
सूरज चव्हाणचं लग्न 29 नोव्हेंबर रोजी असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता सूरज चव्हाणची लग्नाची थेट पत्रिकाच व्हायरल झाली आहे. सूरज चव्हाणच्या अत्यंत जवळच्या व्यक्तींनी सोशल मीडियावर त्याच्या लग्नाची पत्रिका शेअर केली आहे.
सूरज चव्हाणचं लग्न 29 नोव्हेंबर रोजी असून साखरपुडा, हळद आणि लग्न असे तिन्ही महत्त्वाचे कार्यक्रम एकाच दिवशी होणार आहेत. सूरजचं लग्न पुण्यातील सासवड - जेजुरी येथे आहे. 29 नोव्हेंबरला संध्याकाळी 6.11 मिनिटांनी सूरज आणि संजनाच्या डोक्यावर अक्षता पडणार आहेत. त्याआधी दुपारी 12 वाजता दोघांचा साखरपुडा आणि दुपारी 2 वाजता दोघांना हळद लागणार आहे.
advertisement

सूरज चव्हाणचं लग्न कसं, आणि किती धामधुमीत होतंय याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. सूरजच्या लग्नासाठी सिनेसृष्टीतील अनेक मोठी कलाकार मंडळी उपस्थिती लावणार आहेत. त्याचप्रमाणे सूरज चव्हाणला घर बांधून देण्यासाठी मदत करणारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार सूरज चव्हाणच्या लग्नाला उपस्थिती लावणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 18, 2025 11:03 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
घर झालं, मुहूर्त ठरला आता सनई चौघडे वाजणार, सूरज चव्हाणची लग्न पत्रिका समोर, तुम्हाला आली का?


