सुशीला कार्कींच्या पतीचा कारनामा! 30 लाखांची रोकड अन् बॉलिवूड अभिनेत्रीचं प्लेन केलेलं हायजॅक

Last Updated:

Sushila Karki Husband : नेपाळच्या पंतप्रधानपदी सुशीला कार्की यांचं नाव चर्चेत आल्यानंतर त्यांच्या पतीचा कारनामा देखील चर्चेत आला आहे.  1973 साली नेमकं काय घडलं होतं?

News18
News18
मुंबई : नेपाळमध्ये सध्या भ्रष्टाचार आणि हुकूमशाहीविरुद्ध मोठे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनानंतर नेपाळचे पंतप्रधान केपी ओली शर्मा यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर आता  नेपाळच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. यावेळी त्या नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान पदासाठी केपी शर्मा ओली यांचं नाव पुढे येत आहे.  11 जुलै 2016 रोजी कार्की यांची मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली होती. विशेष म्हणजे त्यांना त्या वेळी ओली यांनीच पाठिंबा दिला होता. सुशीला कार्की यांचं नाव चर्चेत आल्यानंतर त्यांच्या पतीचा कारनामा देखील चर्चेत आला आहे.

भ्रष्टाचाराविरुद्ध निर्भय न्यायाधीश

फक्त 1 वर्षाच्या कार्यकाळात कार्की यांनी अनेक धाडसी निर्णय दिले. त्यांनी काही मंत्री आणि प्रभावशाली अधिकारी यांच्याविरुद्ध निकाल देऊन स्वतःची ओळख निर्भय न्यायाधीश म्हणून निर्माण केली. त्यांच्या कडक भूमिकेमुळे त्या जनतेमध्ये विशेषतः तरुणांमध्ये लोकप्रिय झाल्या. पण कार्की यांचा भूतकाळ अनेकांना हादरवून टाकणार आहे.
advertisement

पतीचा वादग्रस्त भूतकाळ  

कार्की यांच्या आयुष्याचा एक वेगळा पैलू म्हणजे त्यांच्या पती दुर्गा प्रसाद सुबेदी यांचा वादग्रस्त भूतकाळ. 10 जून 1973 रोजी विराटनगरहून काठमांडूकडे जाणारे रॉयल नेपाळ एअरलाइन्सचे विमान अपहरण करण्यात आले सुबेदी यांच्यासोबत नागेंद्र ढुंगेल आणि बसंता भट्टाराई होते. भारतीय चलनातील 30 लाख रुपये घेऊन ते नेपाळला जात होते. यात 19 प्रवासी होते ज्यात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री मला सिन्हा या देखील होत्या. त्याचबरोबर नेपाळचे अभिनेते जोडपे सीपी लोहानी हे देखील या विमानात प्रवास करत होते.
advertisement
हा कट तत्कालीन नेपाळ काँग्रेस नेते गिरिजा प्रसाद कोईराला यांनी रचला होता. जे नेपाळचे 4 वेळा पंतप्रधान झाले होते.  दुर्गा प्रसाद सुबेदी हे त्यांचे सहकारी होते. विमान अपहरणानंतर बिहारमधील फोर्ब्सगंज येथे विमान उतरवण्यात आले. नंतर सुबेदी आणि इतरांना मुंबईत अटक झाली आणि 2 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. सशस्त्र संघर्षासाठी म्हणजेच हत्यारं खरेदी करण्यासाठी त्यांनी हा कट रचला होता.
advertisement

स्वतंत्र आणि आदरणीय ओळख

पतीच्या भूतकाळापासून दूर राहून सुशीला कार्की यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यांनी तत्कालीन माहिती व दळणवळण मंत्री जया प्रकाश गुप्ता यांना तुरुंगात पाठवण्याचा ऐतिहासिक निर्णय दिला. तसेच भ्रष्टाचारविरोधी विभाग प्रमुख लोकमान सिंग कार्की यांना पदावरून हटवले. त्यांच्या धाडसी भूमिकेमुळे त्या नेपाळच्या न्यायव्यवस्थेत आदरणीय ठरल्या.

सुशीला कार्की यांचा जीवन प्रवास

advertisement
सुशीला कार्की यांचे जीवन प्रेरणादायी आहे. बनारस हिंदू विद्यापीठात शिक्षण घेताना त्यांची भेट दुर्गा प्रसाद सुबेदी यांच्याशी झाली. कुटुंबाच्या राजकीय पार्श्वभूमी आणि पतीच्या वादग्रस्त आयुष्यापेक्षा वेगळा मार्ग स्वीकारून त्यांनी स्वतःला एक प्रामाणिक आणि कर्तबगार न्यायाधीश म्हणून सिद्ध केले.
मराठी बातम्या/मनोरंजन/
सुशीला कार्कींच्या पतीचा कारनामा! 30 लाखांची रोकड अन् बॉलिवूड अभिनेत्रीचं प्लेन केलेलं हायजॅक
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement