Swapnil Joshi Car : स्वप्निल जोशीने खरेदी केली इतक्या कोटींची रेंज रोवर; म्हणाला, बाबांना चाव्या घेताना पाहून...
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Swapnil Joshi Car Price : स्वप्निलने त्याची ही कार घेऊन त्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे. स्वप्निलने व्हिडिओ शेअर करत एक भावुक पोस्टही लिहिली आहे.
मुंबई : कोण म्हणतं फक्त बॉलिवूड कलाकारांकडे महागड्या कार आहेत? मराठी कलाकारही यात काही कमी नाहीत. प्रसिद्ध अभिनेता स्वप्निल जोशी याने देखील नुकतीच नवी कार खरेदी केली आहे. नव्या कारचा व्हिडिओ स्वप्निलने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. स्वप्निलने त्याची ही कार घेऊन त्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे. स्वप्निलने व्हिडिओ शेअर करत एक भावुक पोस्टही लिहिली आहे. त्याच्या वडिलांचेही त्याने आभार मानले आहेत. स्वप्निलने कोणती कार खरेदी केली? त्याची किंमत किती? पाहूयात.
स्वप्निल जोशीने नुकतीच 'Range Rover Defender' ही कार खरेदी केली आहे. ही कार सध्या मार्केटमध्ये ट्रेंडमध्ये आहे. कारची किंमत देखील चांगलीच महाग आहे. अभिनेता स्वप्निल जोशी मागील अनेक वर्ष सातत्याने अभिनय क्षेत्रात काम करतोय. त्याने प्रचंड कष्टातून त्याची ही नवी कार खरेदी केली आहे.
advertisement
स्वप्निलने कारचा व्हिडिओ शेअर करत पोस्टमध्ये लिहिलंय, “प्रिय आयुष्य! आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे. आमच्या अविश्वसनीय प्रवासातील एक अभिमानास्पद मैलाचा दगड! बाबांना आमच्या नवीन रेंज रोव्हर डिफेंडरच्या चाव्या घेताना पाहून माझे हृदय खूप अभिमानाने, कौतुकाने आणि तुमच्याबद्दलच्या प्रेमाने भरून आलं. सुरुवातीपासून जे अनेकांना कठीण आणि अशक्य वाटेल. तुम्ही नेहमीच मला माझ्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यात अशा शांत आत्मविश्वासाने आणि त्यांना सत्यात बदलण्यात मदत केली आहे."
advertisement
त्याने पुढे लिहिलंय, "डिफेंडर माझ्यासाठी फक्त एक कार नाही तर आम्ही ज्यावर मात केली त्या सर्वांचे ते प्रतीक आहे. आम्ही जे काही निर्माण केले आहे आणि माझे वडील ज्यासाठी उभे आहेत ते सर्व! हे एक स्मरणपत्र आहे की कोणतीही गोष्ट कितीही अशक्य वाटत असली तरीही तुमच्या संयमाने, उत्कटतेने आणि तुमच्या प्रियजनांसह तुम्ही ती मिळवू शकता!"
advertisement
advertisement
"प्रिय आयुष्य... ही तर फक्त सुरुवात आहे!! मला माहित आहे की या प्रवासात चढ-उतार आले आहेत. पण आमची कहाणी एक महान आहे आणि माझा विश्वास आहे की आमच्यासाठी अजून खूप वाट पाहत आहे. तुम्ही मला दररोज प्रेरणा देता आणि मला नम्रतेने आणि सभ्यतेने जगायला शिकवता आणि तुमच्यासोबत या मार्गावर चालण्यात मला धन्यता वाटते आणि सर्वशक्तिमान आमचा मार्गदर्शक प्रकाश आहे! हा आमचा चमकण्याचा क्षण आहे! अभिनंदन गोड आयुष्या", असंही स्वप्निल जोशी म्हणाला.
advertisement
स्वप्निल जोशीने खरेदी केलेली 'Range Rover Defender' या कारची भारतीय बाजारपेठेतील सध्याची ऑन रोड किंमत 1.04 - 1.57 कोटी इतकी आहे. cardekho.com च्या माहितीनुसार, या कारचं इंजिन 1997 cc - 2997 cc इतकं आहे. तर 5,6,7 सिटिंग कपॅसिटीची ही कार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 04, 2024 10:33 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Swapnil Joshi Car : स्वप्निल जोशीने खरेदी केली इतक्या कोटींची रेंज रोवर; म्हणाला, बाबांना चाव्या घेताना पाहून...