'माझ्या लोकांचं रक्त सांडलं...', INDvsPAK सामन्याबाबत नाना पाटेकरांची रोखठोक भूमिका, कडाडून केला विरोध

Last Updated:

Nana Patekar on INDvsPAK Match : नाना पाटेकरांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या क्रिकेट सामन्यावरही आपलं वैयक्तिक मत मांडलं. त्यांच्या वक्तव्याची आता सर्वत्र चर्चा सुरू आहे.

News18
News18
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीचे दिग्गज अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी सुरू केलेल्या ‘नाम फाऊंडेशन’ला नुकतंच १० वर्षं पूर्ण झाली. पुण्यात झालेल्या या दशकपूर्ती सोहळ्यात नानांनी अनेक विषयांवर मनमोकळं भाष्य केलं. त्यांच्या नेहमीच्या रोखठोक स्वरात त्यांनी राजकारण आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरही मतं मांडली, पण सगळ्यांच्या भुवया उंचावल्या त्या त्यांच्या भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅचबद्दलच्या भूमिकेमुळे.

६० लाख शेतकऱ्यांना झाला फायदा!

नाना पाटेकर म्हणाले की, ‘नाम फाऊंडेशन’ला १० वर्षं पूर्ण झाल्याचा त्यांना खूप आनंद आहे. ते म्हणाले, “माझ्यापेक्षा मकरंद गावगाड्यात खूप फेमस आहे. त्याची गावाशी नाळ जोडलेली आहे. समाजाला आपण काहीतरी देणं लागतो, म्हणून आम्ही ही चळवळ सुरू केली.”
नानांनी सांगितलं की, ‘नाम फाऊंडेशन’च्या माध्यमातून आतापर्यंत ६० लाख शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. शेतकऱ्यांसाठी खूप कामं झाली आहेत आणि हे फाऊंडेशन म्हणजे 'माणसांनी माणसांसाठी सुरू केलेली एक चळवळ' आहे, असं ते म्हणाले.
advertisement

आम्हाला श्रेयवाद नको!

राजकारणाबद्दल बोलताना नानांनी स्पष्ट केलं की, त्यांना कोणताही श्रेयवाद नको आहे. ते म्हणाले, “राजकीय व्यक्ती काय म्हणतात, यापेक्षा आपण कामाला महत्त्व दिलं पाहिजे. आम्ही कोणत्याही राजकीय व्यक्तीचा प्रचार करत नाही.” शेतकऱ्यांच्या हक्कांबद्दलही त्यांनी ठोस भूमिका घेतली. “शेतकरी बांधवांना पक्का हमीभाव मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांना दीडपट हमीभाव मिळावा, असं माझं मत आहे,” असं त्यांनी सांगितलं.
advertisement
याच कार्यक्रमात नाना पाटेकरांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या क्रिकेट सामन्यावरही आपलं वैयक्तिक मत मांडलं. ते म्हणाले, “माझ्या मते, भारताने पाकिस्तानसोबत क्रिकेट मॅच खेळूच नये. माझ्या लोकांचं रक्त सांडलं आहे त्यांच्याशी का खेळावं? सरकारचं धोरण काय असावं माहिती नाही.” यावेळी त्यांनी सरकारच्या धोरणांवरही अप्रत्यक्षरित्या प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
मराठी बातम्या/मनोरंजन/
'माझ्या लोकांचं रक्त सांडलं...', INDvsPAK सामन्याबाबत नाना पाटेकरांची रोखठोक भूमिका, कडाडून केला विरोध
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement