Chhaava Movie: छावा सिनेमातील पहिलं गाणं, रश्मिका आणि विक्कीची दमदार केमिस्ट्री, पाहा झलक
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
'छावा' सिनेमातील पहिल्या गाण्याची झलक समोर आलीय. अरिजीत सिंगच्या आवाजात, ए.आर. रहमानचं संगीताने हे गाणं आणखीनच हिट होणार हे नक्की.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून 'छावा' सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे. सिनेमातील काही दृश्यांवरून वादही सुरू होता. ज्यामुळे हा सिनेमा चांगलाच वादात सापडला होता. मात्र वाद पेटल्यावर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी वादग्रस्त सीन हटवण्याचा निर्णय घेतला. अशातच आता 'छावा' सिनेमातील पहिल्या गाण्याची झलक समोर आलीय. पहिल्या गाण्याचा टीझर समोर आला अन् चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली.
छावा सिनेमातील पहिलं गाणं
विकी कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना स्टारर 'छावा' सिनेमातील पहिल्या गाण्याची झलक समोर आलीय. 'छावा'तील समोर आलेल्या पहिल्या गाण्याचं नाव आहे, 'जाने तू'. हे गाणं अरिजीत सिंगने गायलं असून ए.आर. रहमानने संगीत दिलं आहे. गाण्याची पहिली झलक समोर आली असून उद्या हे गाणं रिलीज होणार आहे.
advertisement
दरम्यान, संभाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते. स्वराज्यासाठी त्यांनी मुघलांपासून संरक्षण करताना दिलेला लढा अतिशय प्रेरणादायी आहे. 'छावा' या चित्रपटात त्यांचा जीवनप्रवास आणि त्यांनी स्वराज्यासाठी काय काय केलं दाखवण्यात येणार आहे.
advertisement
शिवाजी सावंत यांच्या “छावा” या कादंबरीवरून प्रेरित होऊन हा सिनेमा तयार करण्यात येत आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी याचं दिग्दर्शन केलं आहे. हा सिनेमा 14 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 30, 2025 2:43 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Chhaava Movie: छावा सिनेमातील पहिलं गाणं, रश्मिका आणि विक्कीची दमदार केमिस्ट्री, पाहा झलक









