Priya Marathe : प्रिया मराठेच्या निधनाच्या आदल्या रात्री नेमकं काय घडलं? सुबोध भावेने पहिल्यांदाच सांगितला संपूर्ण घटनाक्रम

Last Updated:

प्रिया मराठेअवघ्या ३८ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. तिचा चुलत भाऊ सुबोध भावेने एका मुलाखतीत प्रियाच्या निधनाच्या आदल्या रात्री काय घडलं याबाबत सांगितलं आहे.

News18
News18
मुंबई : लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनाने संपूर्ण मराठी कलाविश्वाला धक्का बसला होता. तिचा कर्करोगाशी सुरू असलेला लढा अखेर अपयशी ठरला आणि तिने अवघ्या ३८ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. तिच्या अशा अकाली जाण्याने तिच्या सहकलाकारांसह तिचे चाहतेही शॉक झाले होते. अनेकांनी सोशल मीडियावर तिला श्रद्धांजली वाहिली. अशातच प्रिया मराठेचा चुलत भाऊ सुबोध भावेने नुकत्याच एका मुलाखतीत प्रिया मराठेसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
सुबोधने सांगितलं की, “प्रियाला काही वर्षांपूर्वी कर्करोगाचं निदान झालं होतं. पण ती त्यातून बाहेर पडली आणि पुन्हा एकदा काम करायला लागली. नाटक आणि मालिकांमधून ती पुन्हा प्रेक्षकांसमोर आली. पण, त्या कर्करोगाने काही तिची पाठ सोडली नाही. आमची ‘तू भेटशी नव्याने’ ही मालिका सुरू असताना, तिला पुन्हा एकदा तो त्रास सुरू झाला. या संपूर्ण प्रवासात तिचा पती शंतनू मोघे तिच्यासोबत खंबीरपणे उभा होता.”
advertisement

शेवटच्या दिवसांमध्ये प्रियाची काळजी घेणाऱ्या शंतनूचं केलं कौतुक

यावेळी सुबोधने शंतनू मोघेचंही खूप कौतुक केलं. सुबोध म्हणाला, प्रियाच्या आजारपणात तिची काळजी घेण्यासाठी शंतनूनेही काम थांबवलं होतं. तो पूर्णवेळ तिची काळजी घेत होता. आजच्या काळात असं कोणीही करत नाही. आज जिथे लोक दोन महिन्यात वेगळे होतात, तिथे या आजारपणातही प्रियाला शंतनूचा भक्कम आधार होता.”
advertisement

प्रियाच्या निधनाच्या आदल्या रात्री नेमकं काय झालं?

सुबोधने प्रियाच्या निधनाच्या आदल्या रात्री काय घडलं याबद्दलही सविस्तर सांगितलं. तो म्हणाला, प्रियासाठी शंतनूने काम सोडलं होतं आणि अगदी काही दिवसांपूर्वीच त्याने एक मालिका हातात घेतली होती. प्रिया जायच्या आदल्या रात्री शंतनूचा पहिला एपिसोड रिलीज झाला होता. तो एपिसोड प्रियाने पाहिला होता आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी प्रियाने शंतनू आणि तिच्या आईसमोर प्राण सोडले. प्रियाच्या शेवटच्या दिवसांबद्दल सांगत असताना सुबोध भावेला अश्रू अनावर झाले होते.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Priya Marathe : प्रिया मराठेच्या निधनाच्या आदल्या रात्री नेमकं काय घडलं? सुबोध भावेने पहिल्यांदाच सांगितला संपूर्ण घटनाक्रम
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement