Siddhivinayak Temple Angaraki Explainer: 12 ऑगस्टला अंगारकी संकष्टी, सिद्धिविनायक मंदिरात कधी जावे-ड्रेस कोड काय; वाहतुकीत मोठा बदल व दर्शनाचे वेळापत्रक

Last Updated:

Siddhivinayak Angaraki Sankashti Chaturthi: 12 ऑगस्ट रोजी प्रभादेवीतील सिद्धिविनायक मंदिरात अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त लाखो भाविकांची गर्दी होणार आहे. भाविकांसाठी खास सोयी-सुविधा आणि वाहतुकीत बदलाची व्यवस्था करण्यात आली आहे.

News18
News18
मुंबईच्या प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात 12 ऑगस्ट रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने लाखो भाविकांचे स्वागत करण्यासाठी तयारी सुरू झाली आहे. या दिवशी मुंबईतील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत आणि भाविकांसाठी विशेष सोयी-सुविधा पुरवण्यात येणार आहेत.
अंगारकी संकष्टी चतुर्थीचे महत्त्व
हिंदू पंचांगानुसार संकष्टी चतुर्थी ही प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चौथ्या दिवशी येते. हा दिवस गणपतीला समर्पित असतो, ज्याला विघ्नहर्ता आणि बुद्धीची देवता मानले जाते. हिंदू ज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार हा दिवस अंगारक ग्रहाशी संबंधित आहे. जेव्हा संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणतात. संकष्टी आणि मंगळवार यांचा हा योग अत्यंत शुभ मानला जातो. असे मानले जाते की, या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने आशीर्वाद मिळतात. इच्छा पूर्ण होतात आणि जीवनातील अडथळे दूर होतात.
advertisement
12 ऑगस्ट रोजी वाहतुकीतील बदल
मिड-डेच्या वृत्तानुसार मंगळवार 12 ऑगस्ट रोजी सकाळी 6 ते मध्यरात्रीपर्यंत वाहतुकीवरील निर्बंध लागू असतील.
advertisement
या रस्त्यांवर वाहतुकीवर परिणाम होईल:
-एस. वीर सावरकर रोड (SVS Road)
-एस. के. बोले रोड (SK Bole Road)
-गोखले रोड (दक्षिण आणि उत्तर)
-काकासाहेब गाडगीळ मार्ग
-सायानी रोड
-आप्पासाहेब मराठे मार्ग
12 ऑगस्ट रोजी बंद आणि प्रतिबंधित असलेले रस्ते:
>एस. के. बोले रोड: गोखले रोड आणि अगर बाजार जंक्शनकडून कोणत्याही वाहनाला प्रवेश नाही.
advertisement
>दत्ता राऊळ रोड आणि एन. एम. काळे रोड: गोखले रोडकडून कोणत्याही वाहनाला प्रवेश नाही.
>एस. व्ही. एस. रोड (सिद्धिविनायक मंदिर जंक्शन ते एस. के. बोले रोडपर्यंत): सर्व वाहनांसाठी पूर्णपणे बंद.
>सायानी रोडवरील लेनिनग्राड चौकातून शंकर घाणेकर मार्गाकडे वळणारा उजवा वळण मार्ग (right turn) बंद असेल.
>रवींद्र नाट्यमंदिरकडून डावा वळण मार्ग (left turn) देखील बंद असेल.
advertisement
>12 ऑगस्ट रोजी सिद्धिविनायक दर्शनाचे वेळापत्रक
>'फ्री प्रेस जर्नल'च्या वृत्तानुसार अंगारकी संकष्टी चतुर्थी 12 ऑगस्ट रोजी रात्री 9:17 वाजता सुरू होईल.
>त्या दिवशी दर्शन पहाटे 1:30 वाजता सुरू होईल आणि सकाळी 3:15 वाजता थांबेल.
>पुन्हा सकाळी 3:30 ते रात्री 9:00 पर्यंत दर्शन सुरू राहील.
>दर्शनाचा अंतिम टप्पा रात्री 9:30 वाजता सुरू होऊन 11:50 वाजता संपेल.
advertisement
दर्शनासाठी विशेष व्यवस्था
-मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी सांगितले की, मंगळवारी पाच ते सहा लाख भाविक मंदिरात येऊ शकतात.
-मंदिराच्या वतीने रुग्णवाहिका
-पाणी वितरक आणि अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था पुरवली जाईल.
-महानगरपालिका स्वच्छतेची व्यवस्था करेल.
-मंडपांमध्ये (pavilion) मोफत चप्पल स्टँड उपलब्ध असेल.
-पुरुष, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी दर्शनासाठी स्वतंत्र रांगा असतील.
advertisement
-गर्भगृहातील दर्शनासाठी आणि गॅलरीतून दर्शनासाठी स्वतंत्र रांग असेल.
-एस. के. बोले मार्गावरील मंदिर क्रमांक एकच्या प्रवेशद्वारावर गणपतीच्या दर्शनासाठी दूरस्थ व्यवस्था केली जाईल.
-दर्शनासाठी मंडपांमध्ये थेट प्रक्षेपणासाठी (live telecast) प्लाझ्मा टीव्ही लावण्यात येतील.
-एका चहा कंपनीच्या वतीने सर्व भाविकांना मोफत चहा दिला जाईल.
Here's an exclusive glimpse of #
view comments
मराठी बातम्या/Explainer/
Siddhivinayak Temple Angaraki Explainer: 12 ऑगस्टला अंगारकी संकष्टी, सिद्धिविनायक मंदिरात कधी जावे-ड्रेस कोड काय; वाहतुकीत मोठा बदल व दर्शनाचे वेळापत्रक
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement