advertisement

चाकरमान्यांसाठी खुशखबर! गणेशोत्सवासाठी ST महामंडळाकडून 7500 गाड्यांचे नियोजन; तिकीट बुक कसे कराल?

Last Updated:

चाकरमान्यांच्या सोईसाठी गणेशोत्सवानिमित्त एसटी महामंडळाने गाड्यांची व्यवस्था केली आहे. मुंबईतून 5000 आणि रत्नागिरी विभागाकडून 2500 ज्यादा गाड्यांचे...

Ratnagiri News
Ratnagiri News
रत्नागिरी : चाकरमान्यांच्या सोईसाठी गणेशोत्सवानिमित्त एसटी महामंडळाने ज्यादा गाड्यांची व्यवस्था केली आहे. मुंबईतून 5000 आणि रत्नागिरी विभागाकडून 2500 ज्यादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यापैकी 938 गाड्यांचे आरक्षण फुल्ल झालेले आहे.
तिकीट बुक कसे कराल?
npublic.msrtcors.com या वेबसाईटवरून प्रवाशांना बस आरक्षित करता येणार आहे. त्याचबरोबर आरक्षण बसस्थानकावर किंवा महामंडळाच्या MSRTC Bus Reservation ॲपमधून ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. गणेशोत्सवासाठी 30 ऑगस्टपासून मुंबई, ठाणे, पालघर या विभागातील प्रमुख बसस्थानकांमधून कोकणसाठी गाड्या पाठवण्यात येणार आहेत.
या नागरिकांना देण्यात येणार सवलत
महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी (65 वर्षांवरील) तिकीट दरात 50 आणि 75 टक्के सवलत देण्यात येणार आहे. गौरी-गणपतीचे विसर्जन 2 सप्टेंबर रोजी असल्यामुळे त्या दिवसांपासून परतीच्या गाड्यांची नियोजन रत्नागिरी विभागातून करण्यात आले आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/कोकण/
चाकरमान्यांसाठी खुशखबर! गणेशोत्सवासाठी ST महामंडळाकडून 7500 गाड्यांचे नियोजन; तिकीट बुक कसे कराल?
Next Article
advertisement
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात; बारामतीच्या रनवेवर त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात
  • बारामती अपघात हा शेवटचा इशारा

  • विमान वाहतूक सुरक्षेचे 'ऑडिट' आता तरी होणार का?

  • अजित पवारांचा अंत आणि उडालेली सुरक्षा यंत्रणा

View All
advertisement