Hair care tips: अनेक उपायानंतरही थांबत नाहीये केसगळती? का ‘हे’ सोपे घरगुती उपाय
- Published by:Tushar Shete
Last Updated:
simple home remedies for hair care routine in Marathi: आजच्या धकाधकीच्या जीवनात ब्लडप्रेशर, डायबिटीस या आजारांचा धोका जसा वाढलाय तसाच धोका हा केसगळतीचा सुद्धा वाढू लागलाय. केसगळतीसाठी अनेक कारणं आहेत. तुम्ही सुद्धा केसगळतीच्या समस्येपासून त्रस्त असाल तर आम्ही सांगतो ते साधे सोपे घरगुती उपाय करून पाहा, तुमची केसगळतीची समस्या निश्चितच दूर होईल.
मुंबई : असं म्हणतात की चांगले, लांबसडक केस हे महिलांच्या सौंदर्यांत भर घालतात. मात्र केसांची काळजी ही त्या महिलांसाठी एक चिंतेचा विषय ठरतो. गेल्या काही वर्षांपर्यंत केसगळतीची समस्या ही महिलांना चाळीशी किंवा पन्नाशीमध्ये भेडसावत होती. आता मात्र केसगळतीने महिला- पुरूषांसह सगळ्यांनाच लक्ष करायला सुरूवात केलीये. अगदी लहानवयात सुद्धा अनेक मुलं-मुलींना केसगळतीच्या समस्यांचा सामना करावा लागतो. इतकंच काय तर पुरूषांना टक्कल पडण्याची समस्या हा एक अनुवंशिक आजार मानला जात होता. मात्र आता पुरूषांनाही अकाली टक्कल पडण्याच्या समस्यांचा सामना करावा लागतोय.
का गळतात केस ?
आजच्या धकाधकीच्या जीवनात ब्लडप्रेशर, डायबिटीस या आजारांचा धोका जसा वाढलाय तसाच धोका हा केसगळतीचा सुद्धा वाढू लागलाय. केसगळतीसाठी कामाचा ताण, मानसिक तणाव, हार्मोन्सचं असंतुलन, चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि अनियमित दिनचर्या, केसांची योग्य काळजी न घेणे अशी एक ना अनेक कारणं आहेत. तुम्ही सुद्धा केसगळतीच्या समस्येपासून त्रस्त असाल तर आम्ही सांगतो ते साधे सोपे घरगुती उपाय करून पाहा, तुमची केसगळतीची समस्या निश्चितच दूर होऊ शकेल.
advertisement

केसांच्या मजबुतीसाठी करा ‘हे’ सोपे घरगुती उपाय
1) कांदा : कांद्यामध्ये सल्फर असतं जे केसांना मुळापासून मजबूत करण्यास आणि नवीन केसांच्या वाढीसाठी मदत करतं. कांद्यात असलेल्या अँटी-ऑक्सिडंट्स गुणधर्मांमुळे कोंड्याच्या समस्येपासून सुटका मिळते. याशिवाय कांद्याचे अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म हे केसांसाठी वाढीसाठी फायद्याचे ठरतात.
advertisement
2) कडीपत्ता : कडीपत्ता ज्याप्रमाणे अन्नाची चव वाढवतो, त्याचप्रमाणे तो केसांचे सौंदर्य देखील वाढवण्यात मदत करतो. कढीपत्त्यामध्ये व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, प्रथिनं आणि अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स असतात जे केसांना पोषण देतात आणि त्यांच्या वाढीसाठी मदत करतात.
advertisement
3) मेथी : मेथीमध्ये प्रथिनं आणि व्हिटॅमिन सी असतं जे टाळू निरोगी ठेवण्यास मदत करतं. यामुळे केस मुळापासून घट्ट होऊन केसांची वाढ चांगली होते. याशिवाय, मेथीच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात लोह असतं जे रक्ताभिसरण सुधारायला मदत करतं.
4) काळे तीळ : तिळात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आढळून येतात. काळे तीळ हे टाळूच्या आरोग्यासाठी खूप फायद्याचं मानले जातात. तिळात असलेल्या ओमेगा-3आणि ओमेगा-6 फॅटी ॲसिडमुळे केस चमकदार व्हायला मदत होते.
advertisement
5) आवळा: आवळा केसांसाठी एक उत्कृष्ट आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. आवळ्यात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आढळून येतं. त्यामुळे कोलेजनचं उत्पादन वाढून केसांची मुळं मजबूत होतात आणि केसांना लकाकी येते.
advertisement
6) कोरफड : कोरफडीमध्ये हायड्रेटिंग गुणधर्म असतात जे केसांच्या वाढीस मदत करतात. कोरफडमुळे टाळूला पोषण मिळून पीएच पातळी संतुलित होऊन केसांचा पोत सुधारतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 06, 2025 5:42 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Hair care tips: अनेक उपायानंतरही थांबत नाहीये केसगळती? का ‘हे’ सोपे घरगुती उपाय