advertisement

Interesting Facts : अंटार्कटिकाच्या पांढऱ्या शुभ्र बर्फात खरंच वाहतो 'रक्ताचा झरा'? काय आहे लाल पाण्याचे रहस्य?

Last Updated:

Blood waterfall antarctica : ही दुनिया किती विचित्र आहे, याची जाणीव तुम्हाला तेव्हाच होईल, जेव्हा तुम्ही या जगातील आगळ्यावेगळ्या गोष्टींबद्दल जाणून घ्याल. आज आम्ही तुम्हाला अशाच एका विचित्र गोष्टीबद्दल सांगणार आहोत, जी जगातील सर्वात थंड ठिकाण असलेल्या अंटार्क्टिकामध्ये आहे.

वैज्ञानिकांनी उलगडले रहस्य..
वैज्ञानिकांनी उलगडले रहस्य..
मुंबई : कल्पना करा, जर बर्फ वितळल्यानंतर पाण्याऐवजी रक्त तयार झालं, तर तुम्ही असं पाणी वापराल का? भारतापासून शेकडो मैल दूर अशी एक जागा आहे, जिथे असाच लाल बर्फ आढळतो आणि तो वितळल्यावर रक्तासारखं दिसतं! 'ब्लड फॉल्स' चं रहस्य अनेक वर्षांपासून वैज्ञानिकांना चकित करत होतं, पण अखेर त्यांनी एक दिवस त्यामागचं सत्य शोधून काढलं. असा समज होता की या ग्लेशियरमधून रक्त वाहतं. जाणून घ्या, या दाव्यामागचं खरं सत्य काय आहे.
ही दुनिया किती विचित्र आहे, याची जाणीव तुम्हाला तेव्हाच होईल, जेव्हा तुम्ही या जगातील आगळ्यावेगळ्या गोष्टींबद्दल जाणून घ्याल. प्रत्येक देशात काही ना काही अत्यंत अनोखं असतंच. कुठे ‘स्वर्गाचं दार’ आहे, तर कुठे ‘पाताळात जाण्याचा मार्ग’ आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका विचित्र गोष्टीबद्दल सांगणार आहोत, जी जगातील सर्वात थंड ठिकाण असलेल्या अंटार्क्टिकामध्ये आहे. इथे पांढऱ्या ऐवजी लाल बर्फ दिसतो, ज्यातून पाण्याऐवजी रक्त वाहत असल्यासारखं वाटतं.
advertisement
डेली स्टार न्यूज वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, ब्लड फॉल्सचं रहस्य अनेक वर्षांपासून वैज्ञानिकांना हैराण करत होतं, पण अखेर त्यांनी त्यामागचं सत्य उलगडलं. त्यानंतर लोकांना समजलं की हे प्रत्यक्षात लाल बर्फ किंवा रक्त नाही, तर निसर्गाच्या अनोख्या प्रक्रियेमुळे असं दिसतं. अंटार्क्टिकामधील ‘टेलर ग्लेशियर’ नावाचा हा ग्लेशियर लाल रंगाचा प्रवाह सोडताना दिसतो. तो मॅकमर्डो ड्राय व्हॅलीमध्ये आहे आणि त्याचा शोध सर्वप्रथम 1911 मध्ये लागला होता. अनेक दशकांपर्यंत वैज्ञानिक या रहस्याचा उलगडा करण्याचा प्रयत्न करत होते.
advertisement
वैज्ञानिकांनी उलगडले रहस्य..
अलीकडच्या काळात युनिव्हर्सिटी ऑफ अलास्का फेअरबँक्सने हे रहस्य सोडवले आहे. संशोधनानुसार हा लाल ग्लेशियर किंवा बर्फ आजचा नाही, तर सुमारे 15 लाख वर्षांपासून अस्तित्वात आहे आणि तो सतत सुरू असलेल्या ऑक्सिडेशनमुळे असा दिसतो. प्रत्यक्षात, या खोऱ्यात मिठामुळे खारट पाणी आहे, ज्यामध्ये आयर्नचं प्रमाण खूप जास्त आहे. हे पाणी एका बंद तलावात आहे, जिथे सूर्यप्रकाश किंवा ऑक्सिजन नीट पोहोचत नाही. त्यामुळे त्यांची पातळी इथे खूपच कमी आहे.
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Interesting Facts : अंटार्कटिकाच्या पांढऱ्या शुभ्र बर्फात खरंच वाहतो 'रक्ताचा झरा'? काय आहे लाल पाण्याचे रहस्य?
Next Article
advertisement
Dharashiv ZP Election: आणखी एका पुतण्याकडून काकाला चॅलेंज, थेट भाजपसोबत हातमिळवणी, शिंदे गटाचं टेन्शन वाढलं
आणखी एका पुतण्याकडून काकाला चॅलेंज, थेट भाजपसोबत हातमिळवणी, शिंदे गटाचं टेन्शन व
  • महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या 'काका विरुद्ध पुतण्या' असा संघर्ष नवा राहिलेला न

  • आता याच संघर्षाची ठिणगी शिवसेना शिंदे गटात पडली आहे.

  • धाराशिवच्या परंडा विधानसभा मतदारसंघात उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

View All
advertisement