ब्रिटिश लोक वेडी झाली होती 'डाक बंगला चिकन' ची, असं नाव का पडलं आणि रेसिपी तरी काय?

Last Updated:

. या पदार्थाचं नाव जसं वेगळं आहे, तशीच त्याची चवही निराळी आहे. आज आपण या पदार्थाच्या जन्मामागची कहाणी आणि तो बनवण्याची पद्धत जाणून घेणार आहोत. 

(प्रतिकात्मक फोटो)
(प्रतिकात्मक फोटो)
मांसाहार आणि विशेषतः चिकनची आवड असणाऱ्यांसाठी डाक बंगला चिकन हा एक क्लासिक अँग्लो-इंडियन पदार्थ आहे. हा पदार्थ खूप जुना आणि बंगालच्या संस्कृतीचा भाग आहे. या पदार्थाचं नाव जसं वेगळं आहे, तशीच त्याची चवही निराळी आहे. आज आपण या पदार्थाच्या जन्मामागची कहाणी आणि तो बनवण्याची पद्धत जाणून घेणार आहोत.
गरजेतून जन्मालेला पदार्थ
'डाक' हा शब्द बंगाली भाषेत टपाल व्यवस्थेसाठी वापरला जातो. या चिकन करीचं नाव डाक बंगल्यावरून पडलं, जे मुळात दुर्गम भागात तैनात ब्रिटिश अधिकाऱ्यांना राहायला दिलेलं सर्किट हाउस होतं. ब्रिटिश अधिकार्‍यांसाठी सर्किट हाउसच्या स्थानिक स्वयंपाकींनी हा पदार्थ बनवला होता. या पदार्थाच्या चवीचं बंगाली पाककृतीशी साम्य होतं, जे नंतर बंगालच्या खाद्य संस्कृतीचा एक लोकप्रिय भाग बनलं,या संदर्भातलं वृत्त 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलं आहे.
advertisement
राज प्रभाव
चिकन डाक बंगला आणि या प्रदेशातल्या इतर स्वादिष्ट पदार्थांवर ब्रिटिश खाद्यसंस्कृतीचा जोरदार प्रभाव होता. यात स्थानिक साहित्य आणि मसाले एकत्र केले गेले होते. बंगालमध्ये नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांना खूश करण्यासाठी हे बनवलं गेलं होतं. तुम्हालाही या अँग्लो-इंडियन डिशची चव चाखायची असेल तर रेसिपी वाचा आणि घरी बनवून पाहा.
डाक बंगला चिकन कसं बनवायचं?
advertisement
साहित्य
अर्धा किलो चिकन, एक कप दही, एक टेबलस्पून आलं-लसूण पेस्ट, एक टीस्पून लाल मिरची पावडर, एक टीस्पून हळद, एक टीस्पून गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ
करीसाठी साहित्य
2 टीस्पून तेल, 2 कांदे, 2 टोमॅटो, 2-3 हिरव्या मिरच्या, 1 टीस्पून जिरे, 1 तमालपत्र, 4-5 लवंग, 2-3 वेलची, 1 इंच दालचिनी, 1 टीस्पून धणे पावडर, 1 /2 टीस्पून लाल तिखट, चवीनुसार मीठ, आणि गार्निशिंगसाठी ताजी कोथिंबीर, बटाटे (ऐच्छिक).
advertisement
पद्धत
- सर्वांत आधी चिकनचे तुकडे घ्या आणि ते चांगले धुवा, कोरडे करा आणि मॅरिनेट करा.
- मॅरिनेट तयार करण्यासाठी एका भांड्यात दही, आले-लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि मीठ एकत्र करून चांगलं फेटून घ्या.
- चिकनचे तुकडे झाकून कमीतकमी 30 मिनिटं फ्रिजमध्ये ठेवा किंवा मॅरिनेट करा.
- मध्यम आचेवर जड-तळ असलेल्या पॅनमध्ये तेल गरम करा. जिरं, तमालपत्र, लवंग, हिरवी वेलची आणि दालचिनी घाला. ते एक मिनिट किंवा सुगंध येईपर्यंत परता.
advertisement
- त्यात चिरलेला कांदा आणि हिरव्या मिरच्या घाला. कांदे सोनेरी होईपर्यंत परता. चिरलेला टोमॅटो घाला आणि ते तेल व मिश्रण वेगळं होईल तोपर्यंत भाजा.
- नंतर धणे पूड आणि लाल तिखट एकत्र करा. मसाले शिजेपर्यंत ते काही मिनिटं शिजवा. मग पॅनमध्ये मॅरिनेट केलेले चिकनचे तुकडे घाला. नंतर ते मसाल्यात नीट मिक्स करून घ्या.
advertisement
-चिकन मध्यम आचेवर 10-15 मिनिटं शिजवा, ते तपकिरी होईपर्यंत अधूनमधून ढवळत राहा.
- गॅस कमी करा, पॅन झाकून ठेवा आणि चिकन आणखी 15-20 मिनिटं शिजू द्या. ते शिजेपर्यंत आणि तेल वेगळे होण्यास सुरुवात झाल्यावर बंद करा. करी खूप ड्राय झाली तर तुम्हाला त्यात पाणी घालावं लागेल.
-चिकन शिजल्यावर कोथिंबीर गार्निश करा आणि गॅसवरून काढा. डाक बंगला चिकन तयार झालं. ते गरमागरम भातासोबत सर्व्ह करा.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
ब्रिटिश लोक वेडी झाली होती 'डाक बंगला चिकन' ची, असं नाव का पडलं आणि रेसिपी तरी काय?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement