Calcium deficiency in women: महिलांनो ‘ही’ लक्षणं दिसत असतील आत्ताच व्हा सावध, परिपूर्ण आहाराने दूर करा ‘हा’ आजार
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Tips to overcome calcium and vitamin D deficiency in Marathi: जाणून घेऊयात कोणत्या कारणांमुळे महिलांमध्ये कॅल्शियमच्या कमतरता निर्माण होते आणि त्यांना विविध आजांराना सामोरं जावं लागतं आणि कशा प्रकारे कॅल्शियमची तूट भरून काढता येऊ शकते.
मुंबई : कॅल्शियम हे आपल्या शरीरासाठी एक अत्यावश्यक खनिज आहे. हाडांचा ठिसूळपणा दूर करून त्यांना मजबूत करण्यापासून ते दातांना बळकटी देणं, स्नायूंना मजबूत करणं हृदयाचं आरोग्य राखण्यापर्यंतच्या विविध कामांमध्ये कॅल्शियम महत्त्वाची भूमिका बजावतात. महिलांमध्ये अनेक कारणांमुळे कॅल्शियमची कमतरता आढळून येते. त्यामुळे त्यांना विविध आजारपणाचा सामना करावा लागतो. जाणून घेऊयात अशी कोणती कारणं आहेत ज्यामुळे महिलांना कॅल्शियमच्या कमतरतेचा सामना करावा लागतो आणि कशा प्रकारे कॅल्शियमची तूट भरून काढता येऊ शकते.
आधी जाणून घेऊयात कोणत्या 5 कारणांमुळे महिलांना कॅल्शियमच्या कमतरतेचा सामना करावा लागतो.
1) अपूर्ण आहार
दूध, दही, चीज, हिरव्या पालेभाज्या, अशा अन्नपदार्थातून कॅल्शियम मिळू शकतं. मात्र अनेक कारणांमुळे महिलांना हे अन्नपदार्थ आवडत नाहीत किंवा त्या पुरेशा प्रमाणात त्याचं सेवन करत नाहीत. त्यामुळे त्यांच्यामध्ये कॅल्शियमची कमतरता निर्माण होऊ शकते.
2) पाचक समस्या
advertisement
अनेक महिलांना असेलल्या पचनासंबधीच्या आजारामुळे कॅल्शियमच्या कमतरतेचा सामना करावा लागू शकतो. कारण पचनसंस्थेत जर काही बिघाड असेल किंवा कोणता आजार असेल तर रक्तात आणि हाडांमध्ये कॅल्शियम शोषून घेण्याचं प्रमाण कमी होतं ज्यामुळे कॅल्शियमची कमतरता निर्माण होऊ शकते.
3) विविध औषधं
औषधांचे जसे फायदे असतात तसे त्यांचे अनेक साईड इफेक्ट्ही असतात. त्यामुळे स्टिरॉइड्स आणि अँटासिड्स अशी औषधं कॅल्शियमचं शोषण कमी करू शकतात. त्यामुळे ज्या महिलांना स्टिरॉइड्स आणि अँटासिड्सची औषधं नियमितपणे घ्यावी लागत आहेत अशा महिलांना कॅल्शियमच्या कमतरतेचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे या महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कॅल्शियमची तपासणी आणि कॅल्शियमची औषधं घ्यावीत.
advertisement
4) रजोनिवृत्ती
रजोनिवृत्तीच्या काळात इस्ट्रोजेनची पातळी कमी झाल्यामुळे हाडांमधील कॅल्शियम कमी होऊ लागतं. त्यामुळे रजोनिवृत्तीनंतर महिलांनी स्वत:च्या आरोग्याची जास्त काळजी घेणं हिताचं ठरतं.
5) शारीरिक हालचालींचा अभाव
नियमित व्यायामामुळे हाडं मजबूत होण्यास मदत होते. शारीरिक हालचालींच्या अभावामुळे हाडांमध्ये कॅल्शियम कमी होऊ शकते.त्यामुळे ज्या महिलांना बैठं काम करायची सवय आहे अशा महिलांना कॅल्शियमच्या कमतरतेचा सामना करावा लागू शकतो.
advertisement
कॅल्शियमच्या कमतरतेची कारणं जाणून घेतल्यानंतर आता जाणून घेऊयात लक्षणं
आपल्या शरीरावर झालेल्या रोगांच्या संक्रमणाचा परिणाम जसा सर्दी, खोकला, तापाच्या रूपाने लगेच दिसून येतो तशी कॅल्शियमची कमतरता ही लगेच दिसून येत नाही. त्यामुळे भविष्यात गंभीर आजारांना तोंड द्यावं लागू शकतं. मात्र कॅल्शियमच्या कमतरतेची काही लक्षणं ही नक्कीच दिसून येतात. जर तुम्हाला अशी लक्षणं आढळून आली तर वेळीच सावध होऊन काळजी घ्या.
advertisement
- अंगदुखी आणि पेटके
कॅल्शियमच्या कमतरतेमुळे स्नायूंच्या आकुंचनवर परिणाम होतो. ज्यामुळे अंगदुखी आणि क्रॅम्प्स किंवा पायात गोळे येण्याच्या प्रमाणात वाढ होते.
- दंतविकार
कॅल्शियममुळे दातांचं इनॅमल मजबूत व्हायला मदत होते. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे इनॅमल कमकुवत होऊन विविध दंतविकारांचा सामना करावा लागू शकतो.
- थकवा
स्नायूंच्या दैनंदिन कार्यासाठी कॅल्शियम आवश्यक आहे. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे थकवा आणि अशक्तपणा येऊ शकतो.
advertisement
कॅल्शियमच्या कमतरतेमुळे कोणत्या आजारांचा धोका
- मज्जासंस्थेशी संबंधित समस्या
मज्जातंतूंच्या संपर्कात कॅल्शियम महत्त्वाची भूमिका बजावतं. जर तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता असेल तर हातायांना मुंग्या येणे आणि स्नायू कमकुवत, अंगदुखीसारख्या आजारांचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो.
advertisement
- हाडं कमकुवत होणे
ऑस्टिओपोरोसिस हा एक आजार आहे ज्यामध्ये हाडे कमकुवत आणि ठिसूळ होतात. हा कॅल्शियमच्या कमतरतेचा गंभीर परिणाम आहे.
- ऑस्टियोपोरोसिस
महिलांमध्ये कॅल्शियमच्या कमतरतेमुळे ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढतो. ऑस्टियोपोरोसिसमुळे हाडं कमकुवत होऊन ती ठिसूळ होतात. त्यामुळे जर हाडांवर कोणता आघात झाला तर हाड तुटण्याचा किंवा फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो.
- गर्भधारणेत त्रास
कॅल्शियमची कमतरतेमुळे महिलांना प्रीमेनस्ट्रुअल सिंड्रोम (PMS) चा त्रास होऊ शकतो. याशिवाय गर्भधारणेदरम्यान अडचणी किंवा गुंतागुंत होण्याचा धोका वाढवू शकतो.
- हृदयविकारांचा धोका
रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि हृदयाच्या स्नायूंना बळकट करण्यास कॅल्शियम मदत करतं. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
कॅल्शियमची कमतरता कशी टाळायची?
सकस आहार
आधी सांगितल्याप्रमाणे आपल्याला विविध अन्नपदार्थातून कॅल्शियम मिळू शकतं. दूध, दही, चीज आणि इतर दुग्धजन्य पदार्थ कॅल्शियमचे चांगले स्रोत आहेत. याशिवाय पालक, ब्रोकोली यांसारख्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये कॅल्शियम भरपूर असतं.
सूर्यप्रकाश
कॅल्शियम शोषण्यासाठी आवश्यक असलेले व्हिटॅमिन डी तयार करण्यास सूर्यप्रकाशाची मदत होते. त्यामुळे सकाळची कोवळी उन्हं अंगावर घेतल्यास व्हिटॅमिन तयार व्हायला मदत होते.
कॅल्शियमची औषधं
सध्या बाजारात कॅल्शियम सप्लिमेंट्स उपल्बध आहेत. मात्र अशी औषधं थेट घेण्यापेक्षा डॉक्टरांच्या सल्ल्याने ती घेणं फायद्याचं ठरतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 06, 2025 7:09 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Calcium deficiency in women: महिलांनो ‘ही’ लक्षणं दिसत असतील आत्ताच व्हा सावध, परिपूर्ण आहाराने दूर करा ‘हा’ आजार