Ashok Saraf: अशोक सराफ यांना पाहताच सुनील बर्वेंनी केलं असं कृत्य...VIDEO तुफान व्हायरल
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Ashok Saraf: मराठी चित्रपटसृष्टीला नेहमीच संस्कारांची आणि परंपरेची शान लाभली आहे. ते वेळोवेळी दिसूनही आलं. असाच आणखी एक क्षण पाहायला मिळाला.
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीला नेहमीच संस्कारांची आणि परंपरेची शान लाभली आहे. ते वेळोवेळी दिसूनही आलं. असाच आणखी एक क्षण पाहायला मिळाला. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.'बिना लग्नाची गोष्ट'च्या खास स्क्रीनिंगदरम्यान घडलेला एक छोटासा क्षण सर्वांची मने जिंकत आहे.
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ मराठी रंगभूमी आणि मराठी सिनेमाचा किंग. चार दशकांचा अधिक काळ त्यांनी प्रेक्षकांना हसवलं, रडवलं आणि विचार करायला लावलं. नुकतीच त्यांनी 'बिना लग्नाची गोष्ट'च्या स्क्रीनिंगला हजेरी लावली होती. यावेळी सुनील बर्वेही तिथे उपस्थित होते. त्यांनी जे केलं त्या कृतीने सर्वांची मने जिंकली.
advertisement
व्हायरल व्हिडीओमध्ये दिसतंय, सुनील बर्वे हे स्टेजवर अशोक सराफ यांना पाहतात आणि आदराने त्यांच्या पाया पडतात. त्याच वेळी अशोक सराफ हसतच त्यांना थांबवतात आणि हातात हात देतात. हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आणि लगेचच सोशल मीडियावर व्हायरल झाला. सर्वजण सुनील बर्वेच्या कृतीचं कौतुक करत आहेत.
advertisement
दरम्यान, उद्या 12 सप्टेंबर रोजी अनेक मराठी सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. आरपार, दशावतार आणि बिन लग्नाची गोष्ट या तिन्ही चित्रपटांची प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरू आहे. आता कोणता सिनेमा जास्त प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 11, 2025 3:01 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Ashok Saraf: अशोक सराफ यांना पाहताच सुनील बर्वेंनी केलं असं कृत्य...VIDEO तुफान व्हायरल