Coconut Prices: श्रावणात खिशाला बसणार झळ, सुका मेव्याचे दर वाढले, खोबऱ्यासाठी मोजावे लागणार किलोला एवढे रुपये
- Published by:Mohan Najan
- Reported by:Ravi Shivaji Shikare
Last Updated:
Coconut Prices: सणासुदीच्या तोंडावर खारीक-खोबरे, शेंगदाणे आणि बदामाच्या किमतीत वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला झळ बसणार आहे.
छत्रपती संभाजीनगर : श्रावण महिन्याला शुक्रवारपासून सुरुवात झाली, या महिन्यातील सण, उत्सवाची रेलचेल, उपवास, व्रतवैकल्यास महत्त्व आहे. अनेक जण महिनाभर उपवास ठेवतात. या पार्श्वभूमीवर सुका मेव्याचे दर वाढले आहेत. तर ग्रामीण भागात प्रती एक किलोसाठी उच्च प्रतीच्या खोबऱ्यासाठी किमान 450 रुपये मोजावे लागतात. सणासुदीच्या तोंडावर खारीक-खोबरे, शेंगदाणे आणि बदामाच्या किमतीत वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला झळ बसणार आहे.
श्रावण महिना सुरू होण्याच्या अगोदर खोबर 220 ते 250 रुपये प्रतिकिलो होते. बाहेर बाजारात जर उच्च प्रतीच्या खोबऱ्याची खरेदी केली तर सध्याच्या घडीला 400 ते 450 रुपयांपर्यंत प्रति किलो मिळते. कर्नाटकातून येणाऱ्या खोबऱ्याची आवक कमी झाली असून श्रावण महिना असल्यामुळे ग्राहकांची मागणी खारीक- खोबरं, बदाम आणि शेंगदाणे, खोबरा खिस या फराळासाठी लागणाऱ्या सर्व वस्तूंच्या किमतीत वाढ झाली आहे.
advertisement
छत्रपती संभाजीनगरच्या मोंढ्यातील होलसेल विक्रेत्यांकडे पूजेसाठी लागणाऱ्या बदामाची किमत आधी 180 रुपये प्रति किलो होती आता 250 झाली असून त्याची विक्री 280 रुपये किलोने सुरू असून खारीकच्या किमतीत 50 रुपयाने वाढ झाली. तर खोबरं 360 ते 380 रुपये किलोने विक्री करत असल्याचे होलसेल किराणा विक्रेते ललित धोका यांनी लोकल 18 सोबत बोलतांना सांगितले.
advertisement
श्रावण बरोबरच गणपती, गौरीपूजन, दसरा आणि दिवाळी हे सण देखील अवघ्या काही दिवसांवर आले आहेत. आणि याच काळात कर्नाटकातून येणाऱ्या खोबऱ्याची आवक कमी झाली आणि मागणी वाढल्याने त्याच्या किमतीत सर्वाधिक वाढ झाली आहे. खारीक - खोबरं, बदाम, नारळ, या वस्तूंच्या वाढलेल्या किमती दिवाळीपर्यंत स्थिर राहण्याची शक्यता विक्रेत्यांनी वर्तवली आहे. त्यामुळे दिवाळीपर्यंत सण - उत्सवासाठी लागणाऱ्या पूजेसाठी आणि फराळासाठी लागणाऱ्या वस्तूंसाठी नागरिकांच्या खिशाला झळ बसणार आहे.
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
July 28, 2025 11:36 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Coconut Prices: श्रावणात खिशाला बसणार झळ, सुका मेव्याचे दर वाढले, खोबऱ्यासाठी मोजावे लागणार किलोला एवढे रुपये

