तुम्ही कधी खाल्लाय का चिकन वडापाव? एकदा पाहा हा Video

Last Updated:

वडापाव खाऊन तुम्ही जर आता बोर झाला असाल तर मार्केटमध्ये आता चिकन वडापाव मिळत आहे.

+
News18

News18

मुंबई 31 जुलै : मुंबईचे आणि वडापावचे एक वेगळेच नाते आहे. मुंबईचे फेमस स्ट्रीट फूड म्हूणन ओळख असलेला वडापाव हा सर्वत्र प्रसिद्ध आहे. मुंबईचा कोणत्याही नाक्यावर आपल्याला एक तरी वडापावचा गाडा दिसतोच. खूप वर्षांपासून चालत असलेला हा वडापाव खाऊन तुम्ही जर आता बोर झाला असाल तर मार्केटमध्ये आता चिकन वडापाव मिळत आहे. हा वडापाव ठाण्यात मिळत असून हा चिकन वडापाव खाण्यासाठी नॉनव्हेज प्रेमी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.
कुठे मिळत आहे वडापाव?
ठाण्याच्या स्टेशन जवळील परिसरात असलेले श्री मराठा फुड ऑफ वर्ल्ड या दुकानात चिकन वडापाव खाण्यासाठी खवय्यांची गर्दी होत आहे.या ठिकाणी चिकन वडापावची मागणी सर्वात जास्त केली जाते. श्री मराठा फूड ऑफ वर्ल्डचे मालक भरत दत्ताराम शिंदे आणि आणि त्यांचा भाऊ गणेश दत्ताराम शिंदे गेली सोळा वर्षांपासून हे दुकान सांभाळत आहेत. या ठिकाणी व्हेज आणि नॉनव्हेज असे दोन्ही प्रकारचे वडापाव सोबतच स्पेशल चायनीज भेळ आणि श्वारमा देखील या ठिकाणी मिळतो.
advertisement
कसा बनवला जातो वडापाव?
या चिकन वडापावमध्ये बोनलेस चिकनचे बॅटर बनवून तो वडा तेलात तळला जातो. त्यावर बटरने पाव गरम करून त्या पावात तो वडा स्पेशल चटणी लावून गरम करण्यात येतो. गरमागरम चिकन वडापाव प्लेटवर घेऊन त्याला भरपूर चीज आणि केचप सोबत सर्व्ह केले जाते. या चिकन वडापावची किंमत 50 रुपये अशी आहे.
advertisement
चिकन वडापाव खवय्ये चवीने खातात
हा चिकन वडापाव खवय्ये अगदीच चवीने खातात. चिकन वडापाव बरोबरच लोक येथील चायनीज भेळ देखील आवडीने खातात. आम्ही मार्केटिंगच्या नोकरीला कंटाळून स्वतःचा काहीतरी फूड व्यापार करायचा असे ठरवून श्री मराठा फूड ऑफ वर्ल्डची स्थापना केली. सुरुवातीला या ठिकाणी फक्त चायनीज वेळ मिळायची. मात्र खवय्यांची मागणी लक्षात घेता या ठिकाणी अनेक पदार्थ उपलब्ध आहेत, अशी माहिती येथील मालक भरत शिंदे यांनी दिली आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
तुम्ही कधी खाल्लाय का चिकन वडापाव? एकदा पाहा हा Video
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement