वजन कमी करण्यासाठी होईल मदत, पण ओट्स नेमकं कसं खावं? पाहा Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
ओट्स हा एक असा पदार्थ आहे जो आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. विशेष म्हणजे आपण नाश्ता, दुपारचे जेवण किंवा रात्रीच्या जेवणामध्ये कधीही ओट्स हे खाऊ शकता.
अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : ओट्स हा एक असा पदार्थ आहे जो आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. विशेष म्हणजे आपण नाश्ता, दुपारचे जेवण किंवा रात्रीच्या जेवणामध्ये कधीही ओट्स हे खाऊ शकता. ओट्समध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असतात आणि ते आपल्या शरिरासाठी फायदेशीर आहेत. ओट्समध्ये देखील दोन प्रकार असतात एक मसाला ओट्स आणि दुसरा दुधामध्ये सोक करून खायचे. तर यापैकी कुठले ओट्स हे आपल्या शरिरासाठी चांगले असतात? याविषयीचं छत्रपती संभाजीनगर येथील आहार तज्ज्ञ रसिका देशमुख यांनी माहिती दिली आहे.
advertisement
ओट्स हा पदार्थ मुळात भारतातील नाहीये हा परदेशातील पदार्थ आहे पण ओट्स खाणं हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतं. अनेक लोक डायट करण्यासाठी ओट्स खात असतात. यामधून भरपूर पोषक तत्वे भेटतात. मसाला ओट्स खाण्यापेक्षा दुधामध्ये सोक करून जर खाल्ले तर ते अत्यंत फायदेशीर असतं, असं आहार तज्ज्ञ सांगतात.
advertisement
हे ओट्स खाल्ल्यामुळे तुमचं वजन कमी व्हायला मदत होते आणि जर तुम्ही मसाला ओट्स खाल्ले तर त्यामुळे तुमचं वजन हे वाढू शकत. दुधामध्ये टाकून जर तुम्हाला ओट्स खायचे असतील तर हे ओट्स तुम्ही रात्री दुधामध्ये भिजत घालत ठेवायचे आणि सकाळी खायचे.
सकाळी ओट्स खाण्याआधी त्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची ताजी फळ टाकू शकता किंवा इतरही ज्या बिया आहेत जसं की भोपळ्याची बी, खरबूज बी अशा प्रकारच्या बिया देखील त्यामध्ये टाकून तुम्ही खाऊ शकता. मसाला ओट्स यामुळे खाऊ नये की त्यामध्ये भरपूर असा मसाला किंवा इतर पदार्थांचा वापर होतो आणि ते खाणं शरीरासाठी चांगलं नसतं. त्यामुळे खायचे असतील तर तुम्ही दुधात टाकूनच ओट्स खावे, असं आहार तज्ज्ञ रसिका देशमुख सांगतात.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
January 01, 2025 3:48 PM IST