अस्सल कोकणी मेवा, फक्त 50 रुपयांपासून चाखा चव, मुंबईत इथं आहे प्रसिद्ध स्टॉल

Last Updated:

गजानन साळवी काका आपल्या छोट्याशा स्टॉलमधून मुंबईकरांना कोकणाची अस्सल चव चाखवत आहेत. बदलत्या काळात कितीही आधुनिक खाद्यसंस्कृती आली तरी साळवी काकांच्या स्टॉलसमोर उभे राहिल्यावर घरगुती कोकणी चवीचा मोह टाळणे अशक्यच ठरते.

+
News18

News18

मुंबई : मुंबईच्या वेगवान जीवनशैलीत कोकणाची माती, सुगंध आणि परंपरा जपणारे एक ठिकाण आजही दादरमध्ये अविरत उभे आहे. गेली पन्नास वर्षांहून अधिक काळ गजानन साळवी काका आपल्या छोट्याशा स्टॉलमधून मुंबईकरांना कोकणाची अस्सल चव चाखवत आहेत. बदलत्या काळात कितीही आधुनिक खाद्यसंस्कृती आली तरी साळवी काकांच्या स्टॉलसमोर उभे राहिल्यावर घरगुती कोकणी चवीचा मोह टाळणे अशक्यच ठरते.
त्यांच्या स्टॉलवर ओले काजू, कोकम आणि आगळाची ताजेतवानी फोड, कुरडया, ऋतूनुसार मिळणाऱ्या आंबा-पोळी आणि फणस-पोळीचा गोडवा प्रत्येक पदार्थ मेड इन कोकण आहे. शिवाय कोकणातील घरगुती पद्धतीने बनवलेल्या विविध पिठांचेही येथे मोठे आकर्षण आहे. या सर्व पदार्थांमध्ये कोणत्याही प्रकारची कृत्रिम चव नाही उलट कोकणातील संस्कृती, साधेपणा आणि मातीचा अस्सलपणा प्रत्येक घासात जाणवतो.
advertisement
किंमतीबाबतही साळवी काकांचा दृष्टिकोन अत्यंत परवडणारा आहे. फक्त 50 रुपयांपासून या पदार्थांची सुरुवात होते. मालवणातील चविष्ट सालवाले काजू 100 ग्रॅम 120 रुपये तर सोललेले काजू 130 रुपये. आंबा आणि मिरचीची घरगुती लोणची फक्त 40 रुपये प्रति पॅकेट. कोकम सरबत अर्धा लिटर 110 रुपये आणि एक लिटर 180 रुपये दराने उपलब्ध आहे. मिठाईंमध्ये खडखडे लाडू 70 रुपये आणि खाजा 80 रुपये या दरात मिळतात. चवीला परिपूर्ण आणि किमतीला परवडणारे हे सर्व पदार्थ मुंबईकरांना कोकणाशी जोडून ठेवतात.
advertisement
हा कोकणी मेवा तुम्हाला दादर पश्चिम, एन. सी. केळकर रोडवरील पाटील वाडीच्या जवळ, गिरगाव पंच डेपोच्या शेजारील गल्लीत सहज सापडतो. शिवाय ग्राहकांच्या सोयीसाठी घरपोच सेवेची सुविधाही उपलब्ध आहे. 9987706011 या नंबरवर कॉल केल्यास हवे ते पदार्थ थेट घरी मिळू शकतात, फक्त पोर्टलचे शुल्क ग्राहकाने स्वतः द्यायचे असते.
कोकणाची चव, परंपरा आणि घरगुती गोडवा एका ठिकाणी अनुभवायचा असेल तर साळवी काकांचा हा पारंपरिक स्टॉल नक्कीच भेट देण्यासारखा आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
अस्सल कोकणी मेवा, फक्त 50 रुपयांपासून चाखा चव, मुंबईत इथं आहे प्रसिद्ध स्टॉल
Next Article
advertisement
Gold Price Prediction : नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा धक्कादायक अंदाज
नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध
  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

View All
advertisement