Ghee v/s Butter : तूप आणि बटरमध्ये नेमका काय फरक? आरोग्यासाठी नक्की काय फायद्याचं इथे चेक करा

Last Updated:

गेल्या काही वर्षांत आहारतज्ज्ञांनी आजच्या तरुण पिढीसमोर तुपाबाबत वेगळा दृष्टिकोन मांडला आहे. त्यामुळे आजच्या तरुणांमध्ये तूपाची आवड हळूहळू वाढू लागली आहे. सध्या अनेकजण या संभ्रमात आहेत की तूप आणि लोण्यापैकी (बटर) काय सर्वांत जास्त आरोग्यदायी आहे? चला जाणून घेऊया.

News18
News18
मुंबई : गावरान तुपाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, हे तुम्हाला माहिती असेलच. प्राचीन काळापासून भारतीय स्वयंपाकघरांत त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. शतकानुशतकांच्या पारंपरिक भारतीय औषधांमध्ये शुद्धतेचं प्रतीक म्हणून तुपाचा वापर केला जातो. शरीरावर तुपाचा सकारात्मक प्रभाव पडतो त्यामुळे आत्ताच्या उपचार पद्धतींमध्येही त्याला मान्यता मिळालेली आहे. मात्र, तरीही डायटिंग करताना लोक तूप खाणं टाळतात. कारण, त्यांना वाटतं की तूप खाल्ल्याने ते आणखी जाड होतील. मात्र, गेल्या काही वर्षांत आहारतज्ज्ञांनी आजच्या तरुण पिढीसमोर तुपाबाबत वेगळा दृष्टिकोन मांडला आहे. त्यामुळे आजच्या तरुणांमध्ये तूपाची आवड हळूहळू वाढू लागली आहे. सध्या अनेकजण या संभ्रमात आहेत की तूप आणि लोण्यापैकी (बटर) काय सर्वांत जास्त आरोग्यदायी आहे? 'एबीपी'ने या बाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
घरातील ज्येष्ठ व्यक्ती नेहमी सांगतात की, लहान मुलांना तूप खायला दिलं पाहिजे जेणेकरून त्यांच्या शरीरातील हाडं मजबूत होतील. अनेक पोषक घटक असलेलं तूप हे एक सुपरफूड आहे. त्यामुळे पोट निरोगी राहतं आणि त्यात गूड फॅट्सदेखील असतात. अनेक संशोधनांतून असं समोर आलं आहे की, लहान मुलं दररोज तूप खाऊ शकतात. कारण तुपामुळे शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी होतं.
advertisement
तुपाप्रमाणे लोणी देखील आरोग्यासाठी चांगलं असतं. पण, ते साधं लोणी म्हणजे ज्यात मीठ नसतं ते पांढरं लोणी असलं पाहिजे. पांढरं लोणी घरगुती दुधापासून तयार केलं जातं. लोणी काढून शिल्लक राहिलेलं पाणी तुम्ही ताक किंवा इतर कोणत्याही स्वरूपात वापरू शकता. मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या लोण्यावर प्रक्रिया करून त्यात मीठ मिसळलेलं असतं. जेणेकरून ते बराच काळ टिकेल. हे लोणी आरोग्यासाठी चांगलं नसतं.
advertisement
तूप आणि लोण्याची तुलना केल्यास दोन्हींमध्ये भरपूर पोषक घटक असतात. तुपामध्ये हेल्दी फॅट्ससह व्हिटॅमिन ए, ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड्सही असतात. फोर्टिफाइड लोण्यामध्ये व्हिटॅमिन ए असतं.
प्रति 100 ग्रॅम लोण्यामध्ये 71 टक्के हेल्दी फॅट्स, 3 ग्रॅम अनहेल्दी फॅट्स आणि 717 किलोकॅलरी असतात. 100 ग्रॅम तुपामध्ये 60 टक्के हेल्दी फॅट्स आणि 900 किलो कॅलरी असतात. तुपात अनहेल्दी फॅट्स नसतात. दुकानातून तूप खरेदी करताना लेबल नीट वाचलं पाहिजे. कारण, जर त्यात 'वनस्पती तूप' असा उल्लेख असेल तर ते पारंपरिक तूप नसतं. त्यात अनहेल्दी फॅट्स असण्याची शक्यता आहे.
advertisement
तूप आणि लोण्याची चव खूप वेगळी असते. म्हणूनच ते खूप वेगळ्या प्रकारे वापरले जातात. भारतात, सर्व प्रकारच्या करी, डाळ आणि मांसाचे पदार्थ शिजवण्यासाठी तुपाचा वापर केला जातो. विशेष प्रसंगी पुरी आणि पराठे तळण्यासाठी, रव्याचा शिरा आणि गाजराचा हलवा बनवण्यासाठीदेखील याचा वापर केला जातो. कारण, उच्च तापमानातही तुपात पदार्थ शिजवता येतात.
advertisement
लोण्याचा वापर व्हाईट सॉस किंवा बेचेमेल सारखे इन्स्टंट सॉस बनवण्यासाठी केला जातो. भाजीपाला विशेषत: मासे, कोळंबी आणि खेकडे यांसारखे झटपट शिजणारे पदार्थ बनवताना लोणी हा एक उत्तम पर्याय आहे. लोण्यामुळे मांसाला चांगली चव येते. लसूण व इतर सिझनिंगमध्ये लोणी मिसळल्यानंतर चव आणखी चांगली होते.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Ghee v/s Butter : तूप आणि बटरमध्ये नेमका काय फरक? आरोग्यासाठी नक्की काय फायद्याचं इथे चेक करा
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement