Multifunctional Spaces : लहान घराला द्या परफेक्ट लूक! या स्मार्ट फर्निचर सोल्युशन्सने रूम बनतील मल्टि-पर्पज
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Creating Multifunctional Living Spaces : छोटा फ्लॅट असो किंवा शेअर केलेली जागा असो, या जागा मर्यादित कमी आणि मर्यादित असतात. परंतु फर्निचरची योग्य निवड केल्यास त्या तुमच्या घरासाठी कार्यात्मक, स्टायलिश आणि आरामदायी बनू शकतात.
मुंबई : हल्लीच्या शहरी घरांमध्ये मर्यादित जागेची समस्या हा एक महत्त्वाचा विषय बनला आहे. मग ते स्टुडिओ अपार्टमेंट असो, छोटा फ्लॅट असो किंवा शेअर केलेली जागा असो, प्रत्येक चौरस फुटाचा योग्य वापर करणे महत्त्वाचे आहे. या जागा मर्यादित कमी आणि मर्यादित असतात. परंतु फर्निचरची योग्य निवड केल्यास त्या तुमच्या घरासाठी कार्यात्मक, स्टायलिश आणि आरामदायी बनू शकतात.
स्मार्ट फर्निचर जसे की, नेस्टिंग टेबल्स, वॉल-माउंटेड डेस्क, सोफा बेड इत्यादी.. छोट्या जागांचा सर्वोत्तम वापर करण्यासाठी मदत करतात. वुडेन स्ट्रीटचे सह-संस्थापक आणि सीईओ, लोकेन्द्र राणावत यांनी स्मार्ट फर्निचरची निवड करून तुम्ही छोट्या जागेचा योग्य वापर कसा करू शकता, याबद्दल महिती दिली आहे.
नेस्टिंग टेबल्स : ज्या घरात जागा मर्यादित आहे पण लवचिकता आवश्यक आहे, अशा घरांसाठी नेस्टिंग टेबल्स सर्वोत्तम आहेत. कारण हे टेबल्स गरज पडेल तेव्हा तुम्हाला अतिरिक्त जागा देतात आणि वापर नसताना सहजपणे आत ठेवता येतात. नेस्टिंग टेबल्स अशा प्रकारे डिझाइन केलेले असतात की ते एकमेकांमध्ये सहज बसू शकतात. त्यामुळे त्यांना कोपऱ्यात किंवा मोठ्या टेबलाखाली ठेवणे हा एक उत्तम पर्याय आहे. त्यांचा वापर कॉफी टेबल, साइड टेबल किंवा तात्पुरत्या कामाच्या जागेसाठी करता येतो. हे टेबल्स हलके असल्यामुळे तुम्ही त्यांना हव्या त्या ठिकाणी सहजपणे ठेवू शकता. ज्यामुळे ते घरातील कामासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात.
advertisement
वॉल-माउंटेड डेस्क : वॉल-माउंटेड डेस्क अशा घरांसाठी खास उपयुक्त आहेत, जिथे फ्लोअर स्पेस खूप कमी आहे. हे डेस्क तुमच्या खोलीतील जास्त जागा न घेता कामासाठी एक खास जागा देतात. अनेक वॉल-माउंटेड डेस्क फोल्डेबल किंवा लहान डिझाइनमध्ये येतात, जे वापर नसताना बंद किंवा फोल्ड करून ठेवता येतात. ज्यामुळे तुम्हाला मोकळी जागा मिळते. यात सहसा शेल्फ्ज किंवा लहान ड्रॉवर्ससह अंगभूत स्टोरेज असते, ज्यामुळे तुम्ही स्टेशनरी, पुस्तके आणि इतर कामाच्या वस्तू ठेवू शकता.
advertisement
सोफा बेड : सोफा बेड हे दोन कामे करणाऱ्या फर्निचरचे एक उत्तम उदाहरण आहे. कारण हे लहान अपार्टमेंट आणि पाहुण्यांच्या राहण्यासाठी जागा उपलब्ध करून देतात. दिवसा सोफा म्हणून आणि रात्री बेडमध्ये रूपांतरित होऊन, सोफा बेड एकाच युनिटमध्ये दोन उद्देश पूर्ण करतो आणि खूप जागा वाचवतो. आधुनिक सोफा बेड वापरण्यास सोपे असतात, ज्यामुळे तुम्ही ते लवकर बेडमध्ये रूपांतरित करू शकता. अनेक डिझाइनमध्ये बसण्याच्या जागेखाली लपलेली स्टोरेज असते. जिथे तुम्ही गादी, उशा किंवा हंगामी वस्तू ठेवू शकता.
advertisement
एक्स्टेंडेबल डायनिंग टेबल फर्निचर : रोजच्या वापरादरम्यान एक्स्टेंडेबल डायनिंग टेबल आपण फोल्ड करून लहान बनवू शकतो आणि जास्त पाहुणे आल्यास ते आपण मोठ्या आकारात वाढवू शकतो. फर्निचरचे हे उपयुक्त भाग लहान जागेत आरामदायी जीवन जगणे सोपे करतात आणि तुमच्या गरजेनुसार त्यांना हलवता किंवा ॲडजस्ट करता येते.
स्टोरेज इंटीग्रेटेड डिझाइन : ज्या फर्निचरमध्ये स्टोरेज असते, ते तुम्हाला अतिरिक्त फर्निचरची गरज न ठेवता पसारा कमी करण्यास आणि एकूण व्यवस्था सुधारण्यास मदत करते. यात ऑटोमन्स, गादीखाली ड्रॉवर्स असलेले बेड, लिफ्ट-टॉप कॉफी टेबल्स यांसारखे पर्याय लोकप्रिय आहेत. या अंगभूत स्टोरेज पर्यायांमुळे जागा व्यवस्थित दिसते आणि लहान भागात उपयुक्त स्टोरेज तुम्हाला मिळते.
advertisement
उभे आणि मॉड्यूलर युनिट्स : उभ्या जागेचा वापर करणे हा कॉम्पॅक्ट लिव्हिंगसाठी एक चांगला दृष्टिकोन आहे आणि मॉड्यूलर फर्निचर डिझाइन जागेला न भरता कस्टमाइज्ड स्टोरेज आणि डिस्प्ले पर्याय देतात. बुककेसेस किंवा कॅबिनेटसारखे उंच स्टोरेज युनिट्स भिंतीच्या उंचीचा पूर्ण वापर करतात, ज्यामुळे हालचाल आणि इतर फर्निचरसाठी मोकळी जागा मिळते. मॉड्यूलर सिस्टम्स विशिष्ट मोजमापांनुसार तयार करता येतात आणि बदलत्या गरजेनुसार त्यात बदल करता येतो. उभ्या फर्निचरमुळे लोकांचे लक्ष वरच्या बाजूला जाते, ज्यामुळे छत उंच दिसते. तसेच रूम अधिक मोकळी आणि भव्य वाटते.
advertisement
अस्वीकरण : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 10, 2025 12:13 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Multifunctional Spaces : लहान घराला द्या परफेक्ट लूक! या स्मार्ट फर्निचर सोल्युशन्सने रूम बनतील मल्टि-पर्पज