स्पर्धा परीक्षेला सामोरं जाताना नैराश्य येतंय? मानसोपचार तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
MPSC Exam: स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांत नैराश्याचं प्रमाण वाढत आहे. हे नैराश्य टाळण्याचे उपाय मानसोपचार तज्ज्ञांनी सांगतिले आहेत.
अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : सध्याच्या काळात सरकारी नोकरी मिळवणं हे अनेक तरुणांचं स्वप्न असतं. त्यासाठी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याकडे तरुणांचा कल वाढला आहे. अनेकदा अपयश आल्यानंतर खचून काहीजण नैराश्याचे शिकार होतात. सध्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांत नैराश्याचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळे यातून वेळीच मार्ग काढण्याची गरज आहे. याबाबत छत्रपती संभाजीनगर येथील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. संदीप सिसोदे यांनी उपाय सांगितले आहेत.
advertisement
का येतं नैराश्य?
सध्या अनेक तरुण स्पर्धा परीक्षेत स्वत:ला आजमावत असतात. त्यामुळे स्पर्धा वाढली आहे. स्पर्धेत अनेक विद्यार्थी असल्याने सर्वांनाच लगेच यश मिळत नाही. मात्र, सोबतच्या सहकाराऱ्याला नोकरी मिळाली आणि आपल्याला न मिळाल्यास विद्यार्थ्यांत तणाव वाढतो. अशातच विद्यार्थ्यांचा अधिक वेळ मोबाईलमध्ये जातो. त्यात घरातील जबाबदारी आणि पैशाची चिंता यामुळे देखील विद्यार्थी तणावात असतात. त्याचा परिणाम नैराश्य वाढण्यास होतो, असे डॉक्टर सांगतात.
advertisement
काय करावेत उपाय?
नैराश्याची स्थिती टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाकडे अधिक लक्ष केंद्रीत करावे. मोबाईलवर जास्त वेळ घालवू नये. तसेच मोबाईलचा वापरच कमी करावा. मित्रांसोबत जास्त वेळ घालवू नये. धुम्रपान करणे टाळावे. पुरेशी झोप घ्यावी. अशा प्रकारची सर्व ती काळजी घेऊन योग्य नियोजन करून अभ्यास करावा. तर नैराश्य येणार नाही, असं डॉक्टर सांगतात.
advertisement
सध्या दर महिन्याला 25 ते 30 विद्यार्थी समुपदेशनासाठी येतात. विशेषत: स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी अपयशाने खचतात. त्यामुळे त्यांना समुपदेशनाची गरज असते. तशी स्थिती असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे देखील डॉक्टरांनी सांगितले.
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
December 22, 2024 10:06 PM IST
मराठी बातम्या/हेल्थ/
स्पर्धा परीक्षेला सामोरं जाताना नैराश्य येतंय? मानसोपचार तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला

