हिवाळ्यात आंघोळीला अतिगरम पाणी घेताय, ठरू शकते धोकादायक, पाहा डॉक्टरांचा सल्ला
- Published by:Mohan Najan
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
हिवाळ्यात सकाळी आंघोळ करताना अनेकजण अतिगरम पाणी घेतात. मात्र, अतिगरम पाण्याने आंघोळ करणे हे हृदयरोगाच्या रुग्णांसाठी धोकादायक ठरू शकते.
अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : हिवाळा ऋतू सुरू आहे. सध्याला सर्वच ठिकाणी कडाक्याची थंडी पडत आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी विविध उपाय केले जातात. सकाळी आंघोळ करताना अनेकजण अतिगरम पाणी घेतात. मात्र, अतिगरम पाण्याने आंघोळ करणे हे हृदयरोगाच्या रुग्णांसाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे हिवाळ्यात आंघोळीला अतिगरम पाणी वापरताना काय काळजी घ्यावी? याबद्दलचं हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर गणेश सपकाळ यांनी माहिती दिली आहे.
advertisement
हिवाळ्यात आंघोळीला अतिगरम पाणी वापरताना काय काळजी घ्यावी?
हृदयरोगाच्या रुग्णांसाठी अतिगरम पाणी टाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हलक्या गार पाण्याने आंघोळ करणे किंवा शरीराचा तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी तापमानाच्या मध्यम पातळीवरील पाणी वापरणे योग्य ठरते. गरम पाण्याने आंघोळ करत असताना शरीराच्या सहनशक्तीचा विचार करणे आवश्यक आहे. कडक आणि थंड पाणी शरीरावर काहीसा शॉकसारखा परिणाम करते. थंड पाणी शरीराला तत्काळ प्रतिक्रिया देण्यासाठी उत्तेजित करते, ज्यामुळे रक्तवाहिन्या संकुचित होतात आणि रक्तदाब वाढू शकतो.
advertisement
थंड पाण्याने आंघोळ केल्याने हृदयाला अधिक मेहनत करावी लागते, कारण शरीराला तापमानाच्या बदलापासून वाचविण्यासाठी हृदयाला अधिक रक्तप्रवाहाची आवश्यकता असते. हे हृदयावर अतिरिक्त ताण आणू शकते. तणावमुक्तीसाठी गरम पाण्याची अंघोळ केल्यास मानसिक ताणतणाव कमी होण्यास मदत होते. स्नायू मोकळे होतात, रक्तप्रवाह सुरळीत होतो, गरम पाण्याने आंघोळ केल्याने स्नायू सैल होतात. स्नायूच्या वेदना कमी होण्यासही मदत होते. शरीराला आराम मिळतो. मात्र, अतिगरम पाण्याने आंघोळ करणे टाळावे, असं गणेश सपकाळ यांनी सांगितलं आहे.
advertisement
कडक पाणी आणि साबणाने आंघोळ केल्यास हिवाळ्यात त्वचा कोरडी होते. त्वचा तडकण्याचाही प्रकार होतो. त्वचा संवेदनशील होऊन खाज येऊ शकते. त्यामुळे आंघोळ करण्यासाठी तुम्ही अतिशय थंड पाणी किंवा अतिशय गरम पाणी घेऊन कोमट पाण्याचा वापर करावा, असंही डॉक्टर गणेश सपकाळ यांनी सांगितलं आहे.
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
December 21, 2024 6:45 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
हिवाळ्यात आंघोळीला अतिगरम पाणी घेताय, ठरू शकते धोकादायक, पाहा डॉक्टरांचा सल्ला

