घरात एकतरी रोप असावं, ते नेमकं कोणतं? स्वतः डॉक्टरांनी सांगितलं
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
तज्ज्ञ सांगतात की, घरात भरपूर रोप नसतील तरी चालेल, मात्र एक रोप असायलाच हवं. ते कोणतं जाणून घेऊया.
गुलशन कश्यप, प्रतिनिधी
जमुई : 'आरोग्य हीच खरी संपत्ती' हे आपल्याला कोरोना काळात अचूक कळलं. सुदृढ आरोग्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी दररोज व्यायाम करणं, संतुलित आहार घेणं अत्यंत आवश्यक असतं. खरंतर आपल्या किचनमध्ये अनेक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असे पदार्थ असतात. तसंच आपल्या आजूबाजूला अनेक बहुपयोगी औषधी वनस्पतीही असतात, आपल्याला केवळ त्यांची पुरेशी माहिती नसते इतकंच. त्यांच्या वापरानं आपण आजारपण दूर ठेवू शकतो.
advertisement
काहीजणांना वृक्षारोपणाची प्रचंड आवड असते, त्यामुळे ते घराच्या खिडकीत, अंगणात सुंदर सुंदर रोपांची लागवड करतात. परंतु काहीजणांच्या घरात किंवा घराच्या आजूबाजूला अजिबात झाडं नसतात, असली तरी त्यांची व्यवस्थित वाढ झालेली नसते कारण त्यांची पुरेशी काळजी घेतली जात नाही. तज्ज्ञ सांगतात की, घरात भरपूर रोप नसतील तरी चालेल, मात्र एक रोप असायलाच हवं. ते कोणतं जाणून घेऊया.
advertisement
या रोपाचा प्रत्येक अंग औषधी गुणांनी परिपूर्ण असतो. गंभीर आजारही यामुळे आपल्यापासून दूर राहू शकतात. त्यासाठी या रोपाची पानं सकाळी उपाशीपोटी खाण्याचा सल्ला दिला जातो. हे रोप म्हणजे तुळस. जिला आयुर्वेदात आणि ज्योतिषशास्त्रात अनन्यसाधारण महत्त्व आहे.
advertisement
डॉक्टर सांगतात की, आपल्या घराच्या आजूबाजूला तुळस सहज आढळते. पूजेतही तुळशीचा वापर होतो. या रोपाचीसुद्धा खास पूजा केली जाते. सर्दी, खोकला या साथीच्या आजारांपासून तुळशीच्या रोपामुळे संरक्षण होतंच. परंतु गंभीर आजारांशी लढण्यासाठीही शरीर तयार होतं. कारण तुळशीच्या पानांमध्ये अँटिबॅक्टेरियल गुणधर्म असतात. ज्यामुळे पोटाचंही आरोग्य सुदृढ राहतं. अन्नपचन, पोटातली जळजळ, ऍसिडिटी दूर होते.
advertisement
विशेष म्हणजे तोंडाचा घाण वास येत असेल, तर त्यापासूनही तुळशीच्या पानांमुळे मुक्ती मिळते. रोगप्रतिकारक शक्तीही उत्तम होते. दररोज उपाशीपोटी तुळशीची पानं खाल्ल्यानं शरिराला हे फायदे मिळतात.
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
Location :
Jamui,Bihar
First Published :
July 28, 2024 2:28 PM IST